immersion rod cleaning saam tv
लाईफस्टाईल

Cleaning Hacks : पाणी तापवण्याचा हिटर साफ करण्याची ही भन्नाट टेकनिक करा फॉलो; कमी होईल वीजबिल आणि पाणी होईल पटकन गरम

Winter Cleaning Tips: थंडीत इमर्शन रॉडवर जमा होणारा पांढरा थर रॉडची कार्यक्षमता कमी करतो. घरगुती उपायांनी हा थर काढा, वीज वाचवा आणि पाणी पटकन गरम करा.

Sakshi Sunil Jadhav

थंडीच्या दिवसांत पाणी गरम करण्यासाठी अनेक जण इमर्शन रॉडचा म्हणजेच हिटरचा वापर करतात. हे पाणी गरम करण्याचं एक सोपं आणि स्वस्त प्रोडक्ट आहे. मात्र, जर याची वेळोवेळी स्वच्छता केली नाही, तर काही महिन्यांतच या त्याच्या कॉईलवर पांढरा थर साचतो. हा थर रॉडची कार्यक्षमता कमी करतो आणि विजेचा वापर वाढवतो. त्यामुळे तुमचं लाईट बिल वाढतं आणि रॉडही लवकर खराब होतो.

जर तुमच्या इमर्शन रॉडवरही पांढरा थर जमा होत असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी खालील काही घरगुती उपाय तुमच्यासाठी भन्नाट ठरणार आहेत.

रॉकेलचा वापर करा

इमर्शन रॉडवरील पांढरी थर काढण्यासाठी केरोसीन तेल किंवा रॉकेलचा वापर करू शकता. त्यासाठी रॉडवर केरोसीन तेल चांगलं लावा आणि ते १५ मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. या वेळेत थर मऊ होते. नंतर कोरड्या किंवा थोड्या ओल्या कापडाने रॉड नीट घासून घ्या. काही मिनिटांतच हा पांढरा थर निघून रॉड पुन्हा चमकदार दिसेल.

चुना, मीठ आणि लिंबाचा वापर

जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करायचा असेल, तर चुना, मीठ आणि लिंबाचा रस वापरा. त्यासाठी आधी चुना आणि मीठ एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा आणि ती रॉडवर लावा. पाच मिनिटांनी या पेस्टवर लिंबू रगडा. काही वेळातच पांढरा थर कमी होईल आणि रॉड पुन्हा नवीन दिसेल.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा उपाय

बेकिंग सोडा हे सर्व प्रकारच्या स्केलिंग किंवा पांढऱ्या थर काढण्यासाठी फायदेशीर ठरतं. एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात थोडं व्हिनेगर मिक्स करा. त्यात इमर्शन रॉड १० मिनिटे बुडवून ठेवा. नंतर बाहेर काढून ब्रशने हलकं घासून घ्या. काही मिनिटांत रॉड पुन्हा चमकेल. या सोप्या घरगुती उपायांनी इमर्शन रॉड स्वच्छ राहील, पाणी पटकन गरम होईल आणि विजेचा वापरही कमी होईल. त्यामुळे या थंडीत गरम पाण्याचा आनंद घ्या आणि विजेचा खर्च वाचवा.

टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : भव्य किल्ला अन् मजबूत भिंती; भारतातील 'हे' ठिकाण ऐतिहासिक पराक्रमाचे प्रतीक

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

Atlee Kumar : "We Are Pregnant..."; अ‍ॅटली दुसऱ्यांदा बाबा होणार; बायकोसोबत फोटो शेअर करून दिली गुडन्यूज

Nashik Crime : नाशिक हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवले, दमदाटी केली; ५५ वर्षीय शिक्षकाची ९ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली अन्...

New Toll Rules: केंद्राचा महत्त्वाचा निर्णय! टोल भरला नाही तर वाहन विकता येणार नाही, नियम केले अजूनच कडक

SCROLL FOR NEXT