Mobile phone addiction
Mobile phone addiction  Saam tv
लाईफस्टाईल

Mobile Phone Addiction : बापरे! तुमचंही लहान मुल मोबाईलशिवाय जेवण करत नाही? तर ही बातमी वाचाच

Vishal Gangurde

नवी दिल्ली : विज्ञान हे शाप की वरदान? यावरून अनेकदा तरुणांमध्ये चर्चा रंगतात. हा विषय अनेकदा वारंवार चर्चेत येत असतो. विज्ञानाच्या साहाय्याने विकसित झालेलं तंत्रज्ञानाचेही अनेक तोटे-फायदे आहेत. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे मोबाईल. याच मोबाईलची मोठ्या व्यक्तीपासून ते लहान मुलांनाही लत लागली आहे. आजकाल लहान मुलांना झोपेतून उठल्यावर सर्वात आधी मोबाईल लागतो. लहान मुलांच्या सवयीबद्दल मानसोपचार तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील एका महिलेच्या तीन वर्षांच्या मुलालाही मोबाईलची लत लागली आहे. श्रेयांश असे या मुलाचे नाव आहे. श्रेयांश मोबाईलशिवाय जेवणच करत नाही. त्याला प्रत्येक काम करताना मोबाईल जवळ लागतो. त्याचे आई-वडील त्याच्या या गंभीर सवयीने खूपच वैतागले आहेत. त्याच्या हातातून मोबाईल खेचल्यास तो मोठंमोठ्याने रडू लागतो. त्याच्या रडण्यापुढे त्याचे पालकही वैतागून पुन्हा मोबाईल देतात.

मोतीलाल नेहरू रुग्णालयाचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राकेश पासवान म्हणतात की,श्रेयांशसारखी अनेक मुले मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत जेवण करतात. मुलांच्या या सवयीला त्याचे पालकच जबाबदार आहेत. जर तुमचा मुलगा मोबाईलशिवाय जेवण करत नसेल, त्याचबरोबर तुमचा मुलगा मानसिक आजारी देखील होऊ शकतो. मानसोपचार तज्ज्ञांनी पालकांना लहान मुलांपासून मोबाईल (Mobile) दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. पासवान यांनी पुढे सांगितले की, मुलांची मोबाईलची सवय सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवशैलीत आई-वडील त्यांच्या मुलांना (Child) चांगल्या सवयी लावण्याच्या बाबातीत जास्त गंभीर नसतात. त्यामुळे मुले मोबाईलच्या जगात गुंतून जातात. लहान मुले तासंतास मोबाईलमध्ये गुंतून राहतात. अनेक मुल युट्यूबचे व्हिडिओ (Video) पाहणे आणि गेमच्या आहारी गेले आहेत.

सध्याच्या युगात मानसिक आजार सामान्य झाले आहेत. त्यामुळे या लहान मुलांसोबत आपण वेळ घालवला पाहिजे. कुटुंबातील सदस्यांनी या समस्येवर चर्चा केली पाहिजे. मुलांना मोबाईल केवळ ठराविक वेळेसाठीच द्यायचा. लहान मुलांचे मानसिक आरोग्य चांगलं राहीलं तर त्याचं शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT