Mobile Side Effects
Mobile Side EffectsSaam Tv

Mobile Side Effects : तासनतास मोबाईलचा वापर ठरु शकतो डोळ्यांसाठी घातक ! 'ही' चूक तुम्ही देखील करताय का ?

Smartphone Vision Syndrome :अंधारात फोन वापरायची सवय तुम्हालाही आहे का ?
Published on

Smartphone Effects On Eyes : फोनचा खूप वेळ वापर तुमची दृष्टी कमी करू शकते का? हैद्राबादमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आल्याने हा प्रश्न निर्माण झाला, खरेतर हैद्राबादमध्ये एक ३० वर्षीय महिला घरात तासानंतर फोनचा वापर करत होतीपरिणामी तिची दृष्टी गेली.

ती महिला समस्या सोडवण्यासाठी ज्या डॉक्टरकडे गेली होती,त्या डॉक्टरांनी सोशल मिडीयावरून महिलेची लक्षणे सांगितली.

Mobile Side Effects
Eye Redness Problem : डोळे सतत लाल होत आहेत? यापासून सुटका मिळवण्याचा सोपा उपाय

डॉ. सुधीर कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की,उपचार करण्यासाठी आलेली महिला मंजूच्या दृष्टीत मागील दीड वर्षांपासून अडथळा निर्माण झाला होता.

त्यात तिला प्रकाशाच्या तेजस्वी चमक, काही गोष्टी पाहण्यात समस्या,लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ, गडद झिग जॅक रेषा या गोष्टीचा समावेश होता. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, मंजू नावाच्या महिलेला स्मार्टफोन (Smartphone) व्हिजन सिड्रोम होता.

त्या महिलेने असे सांगितले की,तिने तिच्या अपंग मुलाची काळजी घेण्यासाठी ब्युटीशियनची नोकरी (Job) सोडल्यानंतर ही सर्व लक्षणे समोर आली.

Mobile Side Effects
Eye Care : दररोजच्या या चुकांमुळे खराब होऊ शकतात डोळे, वेळीच घ्या काळजी
Eye Care Tips
Eye Care Tips canva

महिला अंधारात फोनचा वापर करायची

मंजूने नोकरी सोडल्यामुळे ती खूप वेळ फोनचा (Phone) वापर करत असे.रोज तासनतास ती फोन मध्ये व्यस्त राहायची. लाईट बंद झाल्यावर ती अंधारात खूप वेळ फोनचा वापर करत होती.डॉ कुमार यांनी असे सांगितले की,हा स्मार्टफोन व्हिजन सिड्रोम(CVC) या आजाराने पीडित आहे.खूप वेळ स्मार्टफोन,लॅपटॉप, टॅबलेट यासरखे इलेक्ट्रिकल वस्तूचा वापर केल्यामुळे डोळ्यांशी संबधित वेगवेगळी लक्षणे निर्माण होऊ शकतात.त्याला कॉम्पुटर व्हिजन सिड्रोम आणि डिजिटल व्हिजन सिड्रोम असे म्हणतात.

Mobile Side Effects
Eye Glasses Marks On Nose : चष्मा वापरून डोळे, नाकाखाली डाग पडले असतील तर 'हे' नैसर्गिक उपाय करा

डोळ्यांची काळजी कशी घ्यायची?

1. जास्ती वेळ (Time) डिजिटल उपकरणाचा वापर करणे टाळा.स्क्रीन कडे जास्ती वेळ पाहून डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

2. जर तुम्हाला ऑफिसचे काम स्क्रीन समोर बसून करावे लागत असेल तर अशा वेळी, मध्ये २० सेकंदचा ब्रेक घ्या.

3. तुम्ही जर फोन चा वापर करत आहात तर खोलीतील लाईट चालू राहून द्या. अंधारात फोनचा वापर करू नका.

4. डोळ्यांवर ताण आल्यासारखे वाटत असल्यास त्वरित तुमचे डोळे तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com