Eye Redness Problem : डोळे सतत लाल होत आहेत? यापासून सुटका मिळवण्याचा सोपा उपाय

डोळे लाल होणे ही समस्या अतिशय हानिकारक असते.
Eye Redness
Eye Redness Saam Tv
Published On

Eye Redness : बहुतांश लोकांना डोळ्यांसंबंधीच्या समस्या उद्भवत असतात. डोळे लाल होणे ही समस्या अतिशय हानिकारक असते. अशातच घरगुती पर्याय आणि ओव्हर द काउंटर ट्रीटमेंटनुसार डोळ्यांसंबंधीच्या समस्यांना सुधारले जाऊ शकते.

डोळे लाल होणे म्हणजेच डोळ्यांमध्ये रॅडनेस येणे हे जेव्हा डोळ्यांमधील सरफेसखाली छोटे ब्लड वेसल्स, मोठे होतात आणि इम्फ्लेमड होतात. तुमचे सुद्धा डोळे सतत लाल होतात का. असतील तर जाणून घ्या यावरील कारणे आणि उपाय.

डोळे (Eye) लाल होणे ही समस्या वेळेअभावी विकसित होऊ शकते. किंवा एकदम सुद्धा दिसू शकते. बऱ्याचदा डोळ्यांमध्ये रेडनेस होणे अजिबात चांगले नसते. त्यामुळे डोळे दुखतात त्याचबरोबर डोळ्यांमध्ये खाज येणे, आय डिस्चार्ज, डोळे सुजणे यांसारख्या गंभीर दुखण्याला सामोरे जावे लागते.

बरेचदा ही समस्या सामान्य आणि हानिकारक सुद्धा ठरू शकते. तुमचे डोळे एक किंवा अधिक हप्ते लाल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर तुमचे डोळे दुखत सुद्धा आहेत तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे (Doctor) गेले पाहिजे.

Eye Redness
Eye Care : दररोजच्या या चुकांमुळे खराब होऊ शकतात डोळे, वेळीच घ्या काळजी

मेडिकल न्यूज टुडेच्यानुसार डोळे लाल होण्याचे अनेक कारण असू शकतात -

1. डोळे कोरडे पडणे

2. सूर्याच्या किरणांचा डोळ्यावरती जास्त प्रभाव पडणे.

3. डोळ्यांमध्ये धुळ किंवा अन्य पार्टिकल्स जमा होणे.

4. डोळ्यांमध्ये एखादी एलर्जी होणे.

5. डोळ्यांमध्ये एखाद्या गोष्टीचे इन्फेक्शन होणे.

6. इंजुरी होणे.

7. ब्लेफेरायटीस.

8. कंजंक्टीवाइटीस.

9. युवायटीस.

10. कॉल्ड.

11. एक्युट ग्लुकोमा.

12. कोनरियल स्क्रॅच.

Eye Redness
Eye Glasses Marks On Nose : चष्मा वापरून डोळे, नाकाखाली डाग पडले असतील तर 'हे' नैसर्गिक उपाय करा

डोळे लाल होणे या समस्येपासून स्वतःचा बचाव कसा करावा -

डोळे लाल होणे हे एका समस्याचे विशेष कारण नाही आहे. डोळ्यांसोबत तुम्हाला इतर अन्य कोणतीही समस्या असेल तर तुम्हाला डॉक्टरांसोबत बोलणे गरजेचे आहे. डोळे लाल होण्यापासून स्वतःला वाचवा.

1. तुम्ही जर डोळ्यांना बोटाने जोरजोरात चोळत असाल तर असं करने तुमच्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. हात किंवा बोटांमध्ये असलेले सूक्ष्मजीव किंवा माती , कचरा हे डोळ्यांमध्ये जाऊन तुमचे डोळे लाल होऊ शकतात.

2. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरता तर तुमचे लेन्स दररोज साफ ठेवा. त्याचबरोबर जास्त काळ लेंसेस डोळ्यांमध्ये राहणार नाहीत याची काळजी घ्या.

3. तुमचे डोळे सापसूत्रे ठेवा आणि डोळ्यांवरचा आहे मेकअप व्यवस्थितपणे रिमूव्ह करा.

4. कम्प्युटरवर काम करत असताना ब्रेक जरूर घ्या. नाहीतर सतत कम्प्युटर पाहून तुमच्या डोळ्यांमध्ये रेडनेस येऊ शकतो.

5. या गोष्टीला सुनिश्चित करण्यासाठी की आपल्या डोळ्यांचा आजार जास्त गंभीर तर नाही आहे ना, यासाठी तुम्ही तुमचे डोळे चेकअप करून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com