Chikungunya Saam Tv
लाईफस्टाईल

Chikungunya: अरे बापरे! ५१ लाख भारतीयांना दरवर्षी चिकनगुनियाचा धोका; नेमका आजार आहे काय? जाणून घ्या लक्षणं

Chikungunya Symptoms: दरवर्षी पावसाळ्यात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. दरवर्षी ५१ लाख भारतीयांना चिकनगुनिया होतो, असं एका अहवालात समोर आले आहे.

Siddhi Hande

सध्या बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होतात. यामध्ये अनेक आजारांचा समावेश आहे. दरम्यान, आता देशात चिकनगुनिया आजाराचे प्रमाणदेखील वाढत आहे. बुधवारी बीएमसी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. चिकनगुनिया आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अनेकांना चिकनगुनिया होतो. भारतात दरवर्षी ५१ लाख लोकांना चिकनगुनिया होतो, असं एका रिपोर्टमध्या सांगण्यात आले आहे.

बीएमजे ग्लोबल हेल्थने मशीन लर्निंगच्या माध्यमातून जगभरात चिकनगुनियाचे किती रुग्ण आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारतात ५.१ मिलियन लोकांना चिकनगुनिया झाल्याचे समोर आले आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजिन आणि ट्रॉपिकल मेडिसिनने केलेल्या रिसर्चमध्ये सांगितलंय की, सध्या चिकनगुनिया फार वेगाने होत नाही. यामध्ये कोणतीही त्रास नाही. हा आजार बरा होतो. दरम्यान, दरवर्षी चिकनगुनियाचे जगभरात ३४.९ मिलियन रुग्ण वाढतात. तर भारतात १२.१ मिनियल रुग्ण वाढतात.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत ऑगस्ट महिन्यात चिकनगुनियाचे २२० रुग्ण होते तर सप्टेंबरमध्ये १३९ रुग्ण होते. मुंबई सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. चिकनगुनिया हा आजार डास चावल्यामुळे होतो. दरम्यान, आता पावसाळा कमी होत आहे परिणामी डासांचे प्रमाण कमी होत आणि चिकनगुनियाचे प्रमाणदेखील कमी होत आहे.

चिकनगुनिया म्हणजे काय? (What is Chikungunya)

चिकनगुनिया हा आजार डास चावल्यामुळे होतो. यामध्ये तुम्हाला ताप, अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यायची असते. विशेषतः पावसाळ्यात चिकनगुनिया होण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढते.

चिकनगुनियाची लक्षण (Chikungunya Symptoms)

चिकनगुनिया झाल्याची लक्षण डास चावल्यानंतर साधारण २ ते ७ दिवसांमध्ये दिसून येते. यामध्ये तुम्हाला ताप येतो, सांधे दुखतात. तुम्हाला डोकेदुखी आणि थकवा जाणवेल. याचसोबत तुमच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात.

चिकनगुनिया झाल्यावर काय करावे? (Chikangunya Treatment)

चिकनगुनिया झाल्यावर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल, सांधे दुखत असतील तर तुम्ही अॅडमिट होऊ शकतात. याचसोबत आराम करणे खूप गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार औषधे घ्या. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. फळे, भाज्या, सूप हे पदार्थ खा. याचसोबत खूप पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : रावणाच्या ऐवजी श्रीरामांचा पुतळा जाळला; कुठे घडला धक्कादायक प्रकार? पाहा व्हिडिओ

Green Coffee: वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफीचे सेवन योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Manoj Jarange: मराठा आरक्षण ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; मनोज जरांगे नेमकं काय काय म्हणाले? EXCLUSIVE VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २३ हजार मतदार बोगस मतदार

Indian Army Chief : यावेळी तुम्हाला नकाशावरून गायब करु, भारताच्या लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड दम

SCROLL FOR NEXT