Cancer India: जगात कॅन्सर कमी; भारतात मात्र वाढ! तज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

Cancer Lancet Report: लॅन्सेटच्या अभ्यासानुसार जगभरातील कॅन्सर कमी झाला असला तरी भारतात मात्र झपाट्याने वाढतो आहे. तज्ज्ञांनी तंबाखू, प्रदूषण आणि जीवनशैलीमुळे कॅन्सर वाढत असल्याचा इशारा दिला आहे.
New cancer cure found
New cancer cure foundsaam tv
Published On

भारतामध्ये अनेक आजार झपाट्याने पसरतात. त्यातच 'The Lancet'ने केलेल्या चाचणीमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये जगभरातील कॅन्सरचे प्रमाण आणि मृत्यांचा आकडा कमी झाल्याचे कळले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र भारतात या आजाराचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे 'द लॅन्सेट'च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची प्रकरणं आणि मृत्यूदरामध्ये वाढत असून याला तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

अभ्यासानुसार, १९९० मध्ये भारतामधील कॅन्सरचा प्रसार प्रति एक लाख लोकसंख्येमागे ८४.८ इतका होता. तो २०२३ मध्ये १०७.२ वर पोहोचला असून याचा अर्थ तब्बल १५ लाख नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. मृत्यूदर देखील १९९० मधील ७१.७ वरून २०२३ मध्ये ८६.९ वर गेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जवळपास १२.१ लाख रुग्णांचा मृत्यू झाला. याउलट जगभरातील चित्र वेगळे दिसते आहे. जागतिक स्तरावर कॅन्सरचा प्रसार १९९० मध्ये २२०.६ इतका होता, तो २०२३ मध्ये २०५.१ वर आला आहे. मृत्यूदर तर १५०.७ वरून ११४.६ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे भारतातील वाढती आकडेवारी चिंतेचा विषय झाली आहे.

New cancer cure found
Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

तज्ज्ञांच्या मते, भारतातील सुमारे ७० टक्के कॅन्सर हे बदलता येऊ शकणाऱ्या कारणांमुळे होतात. त्यात तंबाखू व दारूचे सेवन, अयोग्य आहार, व्यायाम न करणे, उच्च रक्तदाब व मधुमेह यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर देशातील उच्च प्रदूषणाची पातळी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली देखील धोकादायक ठरत आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतात २०२४ मध्ये १५.६ लाख नवीन कॅन्सर रुग्ण आणि ८.७४ लाख मृत्यूंची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये हीच संख्या १४.१ लाख प्रकरणे आणि ९.१६ लाख मृत्यू इतकी होती. यावरून रुग्णसंख्या आणि मृत्यूदर सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. दिल्लीतील एम्समधील कर्करोगतज्ज्ञांच्या मते, फक्त ‘नो टोबॅको डे’ किंवा 'कॅन्सर डे' साजरा करून काहीही साध्य होणार नाही. सातत्याने जनजागृती मोहिमा राबविणे, कॅन्सरची व्यापक तपासणी करणे आणि लवकर निदानावर भर देणे गरजेचे आहे.

New cancer cure found
Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com