ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना जेवणासोबत लोणचं खायला आवडतं. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, गरोदरपणात लोणचं खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात का, जाणून घ्या.
लोणच्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अॅटी-ऑक्सिडंट्स सारखे पोषक तत्व असतात.
गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय लोणचं खाऊ नये. यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका वाढतो.
दररोज जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते.
लोणच्यामध्ये मसाले आणि तेलाचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात लोणचं खाल्ल्याने पोटात अल्सर होऊ शकतो.
लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे आहारात सोडियमचे प्रमाण वाढते आणि याचा परिणाम किडनीवर होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.