Male Infertility saam tv
लाईफस्टाईल

Male Infertility: शुक्राणूंवर नकारात्मक परिणाम, 'बाप' होणं कठीण? तज्ज्ञांचा सल्ला काय?

Male Infertility: संतुलित आहाराचे सेवन, रोज व्यायाम करणं, योगासने व ध्यानधारणा करून तणावमुक्त राहणे आणि अवैध औषध व स्टेरॉईडचा गैरवापर टाळणे ही काळाची गरज आहे.

Surabhi Jayashree Jagdish

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 25-40 वयोगटातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत चालली आहे. यास कारणीभूत घटकांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव, जीवनशैलीतील बदल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, पर्यावरणातील प्रदूषक आणि व्यसन तसंच पर्यावरणातील विषारी घटकांचा समावेश आहे.

संतुलित आहाराचे सेवन, रोज व्यायाम करणं, योगासने व ध्यानधारणा करून तणावमुक्त राहणे आणि अवैध औषध व स्टेरॉईडचा गैरवापर टाळणे ही काळाची गरज आहे.

ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होते, त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील शुक्राणूंची संख्या कमी होते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे बदलती जीवनशैली. शुक्राणूंची संख्या कमी असणं (ओलिगोझूस्पर्मिया) आणि वीर्यामध्ये शुक्राणू नसणं (अझोस्पर्मिया) हे गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम करतात.

चुकीच्या आहाराच्या सवयी आणि व्यायामामध्ये व्यस्त न राहणे याचा परिणाम पुरुष प्रजनन प्रणालीवरही होतो. फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स लठ्ठपणास कारणीभूत ठरु शकतात आणि त्यात हानिकारक रसायनांचा समावेश असू शकतो जी शुक्राणूंच्या कमी उत्पादनाशी संबंधित आहेत. पर्यावरणीय प्रदूषक आणि विषारी पदार्थ, phthalates आणि bisphenol-A (BPA) सारखी रसायने संप्रेरक पातळीमध्ये व्यत्यय आणतात आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात.

तणावामुळे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते आणि टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पुरुषांनी प्रजनन सल्लागाराचा संपर्कात राहावे असे सल्ला डॉ सुलभा अरोरा(क्लिनिकल डायरेक्टर, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी,मुंबई) यांनी स्पष्ट केले.

खारघरच्या मदरहुड फर्टिलिटी ॲण्ड आयव्हीएफ रूग्णालयातील प्रजनन सल्लागार आणि आयव्हीएफ तज्ञ डॉ. अंकिता कौशल सांगतात की, सध्या केवळ महिलांनाच प्रजनन-संबंधित समस्या येत नाहीत तर पुरुषांनाही याचा सामना करावा लागत आहे. 25 ते 40 वयोगटातील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येत घट होत आहे यास कारणीभूत घटकांमध्ये पर्यावरणीय प्रदूषण, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, दीर्घकाळ बसणे आणि तणाव यांचा समावेश आहे.

पुरुषांनी निरोगी आहार, नियमित व्यायाम, ध्यानासारख्या तणाव व्यवस्थापनाच्या गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे. निरोगी वजन राखणं, अल्कोहोल आणि तंबाखूचं सेवन कमी करणे देखील शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यास मदत करू शकते. दर्जेदार उपचार पर्यायांसाठी, प्रजनन तज्ज्ञांना भेट द्या जे तुम्हाला ठराविक तपासण्या करण्यास सांगतील, असंही डॉ. अंकिता यांनी सांगितलंय.

डॉ सुलभा अरोरा पुढे सांगतात की, शुक्राणुंचं आरोग्य सुधारण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स, निरोगी फॅट्सचा समावेश असलेला पौष्टिक आहार निवडावा. हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य, कडधान्ये, मसूर, सोयाबीन, अंडी, केळी, अक्रोड, टोमॅटो, आणि भोपळ्याच्या बिया खा, रोज व्यायाम करा, योगासने आणि ध्यानधारणा करून तणावमुक्त रहा, तंबाखू, धूम्रपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळा. 20 ते 25 च्या पातळीत योग्य BMI व वजन नियंत्रित राखा. शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी दररोज किमान 8-9 तास झोप घ्या. लक्षात ठेवा, पुरुषांनी स्त्रियांप्रमाणेच त्यांच्या लैंगिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT