Cancer vaccine: भारतासह १४० हून अधिक देशांमध्ये दिली जाते कॅन्सर प्रतिबंध लस? पाहा कोणत्या कॅन्सरवर ठरते प्रभावी

Cancer vaccine: कॅन्सरसारखा गंभीर आजार रोखण्यासाठी लस विकसीत करण्या आली होती. महत्त्वाचं म्हणजे ही लस भारतात देखील तयार केली जाते.
Cancer vaccine
Cancer vaccinesaam tv
Published On

नुकतंच रशियाने कॅन्सरवरील लस उपब्ध केली असल्याची माहिती दिलीये. रशियातील नागरिकांना ही लस फ्री देण्यात येणार असल्याचं रूस सरकारने सांगितलं आहे. मात्र कॅन्सरवर विकसीत झालेली ही पहिली लस नाहीये. यापूर्वी देखील कॅन्सरसारखा गंभीर आजार रोखण्यासाठी लस विकसीत करण्या आली होती. महत्त्वाचं म्हणजे ही लस भारतात देखील तयार केली जाते.

Cancer vaccine
Intermittent Fasting: स्लिम-ट्रीम होण्याच्या नादात टकले व्हाल; डाएटच्या भानगडीत पडण्यापूर्वी हे संशोधन पाहा

कोणत्या कॅन्सरवर लस सध्या उपलब्ध?

देशभरात गर्भाशय मुखाच्या कर्करोग म्हणजेच सर्व्हायल कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कॅन्सरचं निदान होत असल्याची माहिती आहे. यामध्ये ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे या कॅन्सरचं निदान होतं. हाच गंभीर कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी HPV लस देण्यात येते. भारतासह एकूण 140 हून अधिक देशांमध्ये ही लस देण्यात येते.

Cancer vaccine
Winter Health Care: हिवाळ्यात पाठदुखी-मणक्याच्या समस्या सतावतायत? डॉक्टरांनी दिलेल्या या टीप्स वाचाच

स्त्रिरोगतज्ज्ञ आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितलं की, देशात सर्व्हाकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे रूग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी नाही. हा कॅन्सर रोखण्यासाठी HPV लस देण्यात येते. ही लस १३ व्या वर्षापासून मुलींनी घेतलेली योग्य आहे. यामध्ये या लसीचे ३ डोस देण्यात येतात.

डॉ. राजपूत पुढे म्हणाले की, अगोदर भारताबाहेरून ही लस आणली जात होती. मात्र आता ही लस भारतातच तयार केली जाते. Cervavac असं या लसीचं नाव आहे. खाजगी रूग्णालयांच्या माध्यमातून ही लस देण्यात येते.

Cancer vaccine
Cancer vaccine: रशियाची लस नेमक्या कोणत्या कॅन्सरवर करणार उपचार? पाहा तज्ज्ञांनी काय सांगितलं?

HPV लस कसं काम करते?

HPV लस सामान्यतः कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी वापरण्यात येते. ही लस दिल्याने HPV मुळे होणाऱ्या योनी, लिंग किंवा गुदद्वाराच्या कॅन्सरपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ही लस जननेंद्रियातील चामखीळ किंवा गुठळ्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून देखील संरक्षण करते.

Cancer vaccine
Cancer : उतारवयापेक्षा कमी वयात कॅन्सरचा धोका अधिक? नवं संशोधन तरूणांची झोप उडवेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com