Chanakya Niti On Relation Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relation : जोडीदार निवडताना चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा, आनंदात जाईल तुमचे वैवाहिक जीवन

How To Choose Partner : जोडीदार योग्य असेल तर आपले वैवाहिक जीवन अधिक सुखकर जाते.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : लग्न करताना आपण सगळ्यात जास्त कोणाचा विचार करत असू तर ते आहे आपल्या कुटुंबाचा. लग्न हे दोन व्यक्तीच नसून ते दोन कुटुंबाचे असते. लग्नानंतर दोघांचे आयुष्य बदलते.

जोडीदार (Partner) निवडताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. लग्न करताना अनेकदा स्त्री व पुरुष दोघांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहातात. चाणक्य सांगतात की, जोडीदार निवडताना आपण काही गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी. जोडीदार योग्य असेल तर आपले वैवाहिक जीवन अधिक सुखकर जाते. जाणून घेऊया त्याबद्दल

1. दबाव

योग्य जीवनसाथी निवडणे खूप महत्वाचे आहे. चाणक्य नीतीनुसार, दबावाखाली जीवनसाथी निवडू नये किंवा दबावाखाली कोणत्याही व्यक्तींशी लग्न (Marriage) करू नये. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळत नाही.

2. गुणांवर लक्ष द्या

अनेक जण बाह्य सौंदर्य पाहूनच जीवनसाथी निवडतात. केवळ सौंदर्याच्या आधारे बांधलेले नाते यशस्वी होत नाही. सौंदर्याबरोबरच आयुष्याच्या जोडीदाराचे गुण, संस्कार, शिक्षण हेही बघायला हवे.

3. रीतीरिवाज

आचार्य चाणक्य म्हणतात की, लग्न करताना आपल्या कुटुंबाची आणि चालीरीतींची काळजी घेणे आवश्यक आहे. धर्म-कर्मावर विश्वास असलेला जीवनसाथी निवडावा, जेणेकरून जीवन शांततेने आणि प्रेमाने पार पडेल.

4. संयम

कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देता येते. म्हणून, तुमच्या भावी जीवनसाथीच्या संयमाचे मूल्यांकन करा. यासोबतच त्याची बोलण्याची पद्धत पाहणेही महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT