Relationship Tips : सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीच्या नात्यात समजूतदारपणा हा आवश्यक असतो. पती-पत्नीचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे. हे नातं जपताना प्रत्येकालाच काळजी घ्यावी लागते.
वैवाहिक (Married) जीवनात किंवा प्रेमसंबंधांमध्ये आनंदासाठी चांगला जोडीदार किंवा जीवनसाथी मिळणे खूप गरजेचे असते. अनेक वेळा एखादी व्यक्ती इतर गोष्टींच्या आकर्षणाच्या मागे सोडून जाते आणि परिणामी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. पण आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रातील एका श्लोकाद्वारे म्हणजेच चाणक्य नीतीत सांगितली आहे की लग्न किंवा प्रेमापूर्वी मुलीमध्ये कोणत्या गोष्टींची चाचणी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल...
वरयेत् कुलजन प्रग्यो विरुपमपि कन्यकम् ।
रूपशीलं न निश्चस्य विवाहः सदर्षे कुळे ।
1. चाणक्य नीतीच्या या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, लग्नापूर्वी जीवनसाथी निवडताना व्यक्तीने तिच्या सुंदर शरीरापेक्षा तिच्या गुणांकडे पाहिले पाहिजे. चाणक्याच्या मते, पुरुषांनी स्त्रीच्या सौंदर्याचा नाही तर तिच्या मूल्यांचा आणि गुणांचा न्याय केला पाहिजे.
2. पुरुषांनी सुंदर महिलांच्या (Women) मागे धावू नये. पत्नी जर सद्गुणी असेल तर कठीण प्रसंगातही ती कुटुंबाची काळजी घेते आणि कोणालाही कधी दुःखी करत नाही.
3. चाणक्य म्हणतात की, बाह्य सौंदर्यांपेक्षा नेहमीच सर्वस्व नाही. म्हणूनच व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या (Partner) मनाच्या सौंदर्याला महत्त्व दिले पाहिजे. स्त्रिमध्ये संयम असेल तर ती घर चांगले बनवते आणि कठीण प्रसंगातही ती आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
4. माणसांने नेहमी त्याच्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला हवी. इतकेच नाही तर लग्न करण्यापूर्वी आपल्या चालीरीतीच्या बाबतीतही जाणून घ्यायला हवे. तसेच धार्मिक गोष्टींवर तिचा किती विश्वास आहे हे देखील तपासायला हवे. कारण धार्मिक कर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मर्यादित असते.
5. स्त्रीचा राग हा संपूर्ण कुटुंबाला उद्धवस्त करु शकतो. त्यामुळे तिने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या रागाविषयी आपण सर्वकाही जाणून घ्यायला हवे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.