कोमल दामुद्रे
आपल्या घरातील मोठी माणस आपल्याला सतत सांगत असतात की, रात्रीच्या वेळी नखे कापू नये.
मोठ्यांच्या या बोलण्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत.
नखे कापण्याबाबत काही नियम देण्यात आले आहेत.
धम्र आणि ज्योतिष यांच्यानुसार सूर्यास्ताच्या वेळी आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी नखे कधीही कापू नयेत
त्यामुळे लक्ष्मी नाराज होते व दारिद्रयाचा सामना करावा लागतो.
आठवड्याच्या सात दिवसांत नखे कापण्याचेही वेगवेगळे परिणाम होतात.
तर जाणून घ्या नखे कापण्यासाठी कोणता दिवस सर्वात शुभ आहे.
सोमवारी नखे कापणे चांगले. असे केल्याने तमोगुणापासून मुक्ती मिळते
मंगळवारी नखे कापणे वर्ज्य आहे. मंगळवारी नखे कापल्याने कर्जापासून मुक्ती मिळते.
बुधवार नखे कापण्यासाठी शुभ आहे. बुधवारी नखे कापल्याने संपत्ती मिळते.
गुरुवारी नखे कापल्याने सत्त्वगुण वाढतो.
नखे कापण्यासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.
शनिवारी नखे कापू नयेत. यामुळे शनिदेव नाराज होतात. ज्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
रविवारी नखे कापणे अशुभ मानले जाते. रविवारी नखे कापल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. यशाच्या मार्गात अडथळे येतात.