Chanakya Niti Saam TV
लाईफस्टाईल

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार 'या' चुकांमुळे संपत्तीचा नाश होतो; दारिद्र्य आणखी वाढतं

Chanakya Niti on Relationship : माणसाने आपल्या आयुष्यात जे काही वाईट केले आहे त्याचे भोग त्या व्यक्तीला इथेच भोगावे लागतात. त्यामुळे आयुष्यात पुढे जायचे असेल तर चुकूनही या चुका करू नका.

Ruchika Jadhav

आचार्य चाणक्य यांच्या विचारांनी चालल्याणे जीवनात कायम सुख आणि शांती लाभते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती चाणक्य नीतीमधील विचार वाचत असतात. आचर्य चाणक्य हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकाराणी आणि महान व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी आखलेल्या नियमांनुसार वागल्यास जीवनात आनंद येतो.

मात्र आचार्य चाणक्य सांगतात की, माणूस आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या चुकीच्या असतात मात्र त्यांना त्या बरोबर वाटतात. माणसाने आपल्या आयुष्यात जे काही वाईट केले आहे त्याचे भोग त्या व्यक्तीला इथेच भोगावे लागतात. त्यामुळे आयुष्यात पुढे जायचे असेल तर चुकूनही या चुका करू नका.

वाईट मार्गाने पैसे कमवणे

पैशांची गरज प्रत्येक व्यक्तीला असते. मात्र गरज वेगळी आणि चैन वेगळी. काही व्यक्तींच्या चैनीच्या गरजा इतक्या जास्त वाढल्या आहेत की त्यांना त्या पूर्ण करण्यासाठी कधीच मेहनीतीने कमवलेले पैस पुरत नाहीत. त्यामुळे कुणाला फसवून किंवा चुकीच्या मार्गाने व्यक्ती पैसे कमवण्यास सुरूवात करतात. मात्र अशा मार्गाने पैसे कमवणे म्हणजे नुकसान ओढावून घेण्यासारखे आहे.

देवाचे नामस्मरण न करणे

प्रत्येक घरात आपल्या देवी-देवतांची पूजा व्हायला हवी. पूजा न केल्यास त्या घरावर देवीची, लक्ष्मीची कृपादृष्टी राहत नाही. आर्थिक संकट येते. तसेच त्या घरामध्ये व्यक्तींच्या मनात आनंद कधीच टिकत नाही. तसेच घरात नकारात्मक उर्जा येते. त्यामुळे घरामध्ये एकदा तरी देवाचे नामस्मरण केले पाहिजे.

महिलांचा अपमान करणे

महिला म्हणजे साक्षात लक्ष्मी असते. त्यामुळे महिलांचा कधीच अपमान करू नका. काही घरांमध्ये महिलांना दुय्यम स्थान किंवा दुय्यम वागणूक दिली जाते. शुल्लक चुकांसाठी महिलांना मारहाण करणे, त्यांचा सतत अपमान करणे या चाणाक्य नीतीविरोधातील गोष्टी आहेत. त्यामुळे नेहमी सर्वच महिलांचा मान ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'लाइफ इन अ मेट्रो'चा रेकॉर्ड ब्रेक, वाचा संडे कलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

SCROLL FOR NEXT