Saam Maha Exit Poll : संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये संभाव्य नगराध्यक्ष कोण? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

Saam Maha Exit Poll update : संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये संभाव्य नगराध्यक्ष म्हणून समीर सत्तार यांचं नाव चर्चेत आहे. एक्झिट पोलनुसार, सिल्लोडमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळतंय.

राज्यातील २८८ नगरपालिका निवडवणुकीत उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद झालंय. या पालिका निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजे रविवारी निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. एक्झिट पोलनुसार, संभाजीनगर सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर संभाव्य नगराध्यक्ष म्हणून समीर सत्तार यांचं नाव चर्चेत आहे. या परिषदेत शिंदे गटात २५ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. सिल्लोडमध्ये शिंदे सेनेने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झटका दिल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com