वर्ल्ड कपच्या टीममधून शुबमन गिलला का दिला डच्चू? अजित आगरकरनं सांगितलं कारण

T20 World Cup Shubman Gill : भारताच्या टी-२० विश्वचषक २०२६ संघातून शुबमन गिलला वगळण्यात आलंय. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी या धक्कादायक निर्णयामागील कारण स्पष्ट केलंय.
T20 World Cup Shubman Gill
Chief selector Ajit Agarkar addressing the media after announcing India’s T20 World Cup 2026 squad.saam tv
Published On
Summary
  • टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

  • शुबमन गिलला संघातून वगळण्यात आल्याने मोठा धक्का मानला जातो.

  • मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत कारण स्पष्ट केलं.

टी २० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत. यावेळी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयनं आणि संघाच्या निवडकर्त्यांनी जबर धक्का दिला. त्याच कारण म्हणजे टीम इंडियाचं टी २० संघाचं कर्णधार पद भूषविणाऱ्या शुबमन गिललाच संघातून डच्चू देण्यात आलंय. गिलला संघातून ड्रॉप केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

T20 World Cup Shubman Gill
T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

शुबमन गिलला अचानक कर्णधार पदाची लॉटरी लागली होती. पण त्याचप्रकारे त्याला टीममधून बाहेर करण्याचा निर्णयाने अनेकांना धक्का दिला. तर दुसरीकडे अक्षर पटेलची उपकर्णधार पदी नियुक्ती करण्यात आलीय. निवड समितीने घेतलेल्या निर्णयाने आणखी एक धक्का बसला तो म्हणजे टी २० वर्ल्ड कप संघामध्ये ईशान किशन याची निवड करण्यात आली आहे. ईशान बऱ्याच काळापासून संघाचा भाग नव्हता. पण त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. त्याचमुळे त्याची निवड झाल्याचं म्हटलं जात आहे.

T20 World Cup Shubman Gill
टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

शुबमन गिलला संघातून का काढलं?

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना शुभमन गिल याला संघातून का ड्रॉप केल. असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. गिलला बाहेर काढण्याचा निर्णय टीम कॉम्बिनेशनला पाहून घेण्यात आलाय. टॉप ऑर्डरमध्ये तुमच्याकडे जर विकेट कीपर असेल तर खालच्या इतर फलंदाजांना संधी देता येऊ शकते, असं अजित आगरकर म्हणाले.

अजित आगरकरांनी शुबमन गिल याच्या फॉर्मवरही भाष्य केलं आणि त्याबाबत चिंता व्यक्त केली. गिलचा स्ट्राईक रेट यावेळी निराशाजनक आहे. टी २०मध्ये तो एकाही सामान्यात अर्धशतक करू शकलेला नाही. त्यामुळे टीममधून ड्रॉप होण्याचं एक कारण म्हणजे त्याचा खराब फॉर्म सुद्धा असल्याचं आगरकर यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com