T20 World Cup Squad : शुभमन गिलचा पत्ता कट, २ वर्षांपासून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री

ishan Kishan for T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. दोन वर्षांनंतर इशान किशनचे पुनरागमन झाले.
Shubman Gill dropped
Shubman Gill droppedsaam tv
Published On

Team India Squad Announcement Live, T20 World Cup 2026: टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात १५ जणांचा चमू जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या शुभमन गिल (Shubman Gill dropped) याला वगळण्यात आले आहे. तर अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघात इशान किशन आणि रिंकू सिंग यांचा समावेश करण्यात आलाय. (Team India Squad Announced for T20 World Cup 2026: Gill Dropped, Kishan Returns)

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी कऱणाऱ्या इशान किशन याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाल्याचे अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विश्वचषकात भारतीय संघाकडून संजू सॅमसन अन् अभिषक शर्मा सलामीला उतरतील, यावर आज शिक्कामोर्तब झालेय. गिल याला संघाबाहेर ठेवण्यात आले, हा चकीत करणारा निर्णय ठरलाय. शुभमन गिल दक्षिण आफ्रिका मालिकेपर्यंत भारतीय संघाचा उपकर्णधार होता. खराब फॉर्ममुळे शुभमनवर वारंवार टीका झाली. विश्वचषकात ही जबाबदारी अक्षर पटेल याच्यावर सोपवण्यात आली आहे. Why Shubman Gill dropped from T20 team

Shubman Gill dropped
T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये ईशानचा जलवा -

ईशान किशन याने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी केली. ईशानच्या नेतृत्वात झारखंडने पहिल्यांदाच मुश्ताक अली चषकावर नाव कोरले. ईशान किशन याने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. फायनलमध्ये ईशान किशन याने शानदार शतक ठोकत झारखंडला विजय मिळवून दिला.फायनलमध्ये इशान किशनयाने ४९ चेंडूमध्ये १० षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०१ धावांचा पाऊस पाडला. SMAT च्या फायनलमध्ये शतक ठोकणारा ईशान पहिला कर्णधार ठरलाय. सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत ईशान किशन याने शतकांचा पाऊस पाडलाय. गेल्या काही दिवसांपासून किशन याने शानदार कामगिरी केली.

Shubman Gill dropped
T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

ईशान किशानला संधी का मिळाली?

शुभमन गिल याला टी२० मधील मागील २० डावात एकही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाने ईशान किशन याला संधी दिली आहे. ईशान किशन याला पर्यायी विकेटकीपर अन् सलामी फलंदाज म्हणून निवडले आहे. दोन वर्षांपासून विकेटकीपर म्हणून फलंदाजी करणाऱ्या जितेश शर्मा याचा पत्ता कट झालाय.

Shubman Gill dropped
Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

२ वर्षापूर्वी अखेरचा सामना -

ईशान किशन याने नोव्हेंबर २०२३ मध्ये अखेरचा टी२० सामना खेळला होता. तर ऑक्टोबर २०२३ मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला. कसोटीमध्येही तो जुलै २०२३ मध्ये अखेरचा खेळला होता. जवळपास दोन वर्षानंतर ईशान किशन याचे टीम इंडियात कमबॅक झाले आहे. मागील वर्षभरापासून टीम इंडियात चांगली कामगिरी करणाऱ्या जितेश शर्मा याचा पत्ता कट झालाय. तर दुसरीकडे रिंकू सिंह याचे टीम इडियात कमबॅक झालेय.

Shubman Gill dropped
Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

टी२० विश्वचषकासाठी टीम इंडिया - T20 World Cup India playing XI updates

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत सिंह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंह, हर्षित राणा आणि इशान किशन (विकेटकीपर).

Shubman Gill dropped
Mumbai-pune : मुंबईहून पुणे फक्त ९० मिनिटात अन् बंगळुरू ५ तासात, नव्या एक्सप्रेसची A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com