Chanakya Niti On Life Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Life Quotes : चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा, तुमचं नशीबचं बदलेल

Life Management Tips : आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येकाला आयुष्यात नवीन संधी मिळत असते.

कोमल दामुद्रे

Motivational Quotes :

आयुष्यात आपल्या प्रत्येकाला यश हवे असते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करतो. परंतु, यश मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येकाला आयुष्यात नवीन संधी मिळत असते. योग्य मार्गाचा अवलंब केल्यास आपण आपले जीवन सुधारु शकतो. ज्यामुळे आपल्याला यश सहज मिळेल. चाणक्य म्हणतात की, दैनंदिन जीवनात या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपण भाग्य बदलण्यास मदत होईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कमजोरी

चाणक्य म्हणतात की, तुमची कमजोरी कोणत्याही व्यक्तीला सांगू नका. ज्याचा परिणाम तुमच्या वाईट काळात होतो. त्यामुळे आपल्या बाबतीत कोणत्याही गोष्टी सांगताना काळजी घ्या.

2. जपून पैसे खर्च करा

चाणक्यांच्या मते, भविष्यासाठी माणसाने पैसे साठवायला हवे. असे केल्याने तुम्ही कोणत्याही अडचणीचा सामना करु शकता. त्यामुळे पैसे (Money) खर्च करताना विचारपूर्वक आणि गरज असेल तेव्हाच खर्च करा.

3. मुर्ख लोकांशी वाद घालू नका

चाणक्यांच्या मते, मुर्ख लोकांशी वाद घालू नये. असे केल्याने आपले नुकसान होते. शिवाय आपली प्रतिमा देखील वाईट होते.

4. विश्वास

चाणक्य (Chanakya) यांच्या मते, जे लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात ते विश्वासाला पात्र नसतात. अशा लोकांना तुम्हाला दु:खात पाहून आनंद होतो.

5. ध्येय

चाणक्य यांच्या मते तुम्ही तुमचे ध्येय कोणाला सांगू नये. यामुळे लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. एखाद्या व्यक्तीचे यश (Success) त्याच्या मेहनत, रणनीती आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT