कोमल दामुद्रे
पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.
रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावतो.
डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा चमत्कार आहे.
भिरा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा आहे.
भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते.
पुण्यातील चांदणी चौकातून किमान ७० किमी अंतरावर भिरा परिसर आहे.
देवकुंड धबधबा हे लवासातील एक लपलेले रत्न आहे.
20 फूट उंचीवरून कोसळणारे पाणी पाहून प्रवाशांना डोळे दिपतात.
येथे पोहोचल्यानंतर देवकुंड पर्यटन टीम तुम्हाला कॅम्पिंग, ट्रेकिंग यांसारख्या साहसी उपक्रमांची संपूर्ण माहिती देते.