Chanakya Niti About Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Success: कठीण मार्गही होईल सुकर, यशस्वी होण्यासाठी चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

How To Become Successful In Life : यशाच्या मार्गावर आपल्याला अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Success Tips By Chanakya Niti : माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींवर विशेष भर द्यावी लागते. यशाच्या मार्गावर आपल्याला अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते. अशावेळी या वाटेवर असताना बरेचदा मार्ग हा कठीण वाटू लागतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसांने ठरविले तर तो कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करु शकतो. त्यासाठी त्याला मनाने व बुद्धीने काम करावे लागते. माणूस बुद्धीने किंवा मनाने स्थिर असेल तर तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. चाणक्यांनी यशाच्या वाटेवर चालताना कठीण मार्ग सुकर होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या त्याबद्दल सांगितले आहे जाणून घेऊया

1. बदल महत्त्वाचा

चाणक्य (Chanakya) म्हणतात की वाईट काळ हा आपल्याला अनेक नव्या संधी देत असतो. अशावेळी संयमाने काम करणे गरजेचे असते. अशात आपण आपले कौशल्य वाढवायला हवे. आपण कुठे कमी पडतो आहे ते सुद्धा तपासायला हवे.

2. अनुकूलनक्षमता

प्रत्येकाने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत आपण जुळवून घेतले तर आयुष्यात यशस्वी (Success) होण्यासाठी आपल्याला कुणीही रोखू शकत नाही.

3. आत्मपरीक्षण

चाणक्य म्हणतात की, माणसाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असे केल्याने तो कोणत्याही कठीण (Problem) आव्हानांवर मात करण्यासाठी त्यानुसार रणनिती आखतो. योजना तयार करताना अनेकांचा सल्ला घेतो. त्यामुळे यश नक्कीच त्याला मिळते.

4. उशीर नको

चाणक्याच्या मते, महत्वाची कामे आणि निर्णय उशीर घेणे किंवा लांबवणे तुमच्या यशासाठी अडथळा ठरू शकतो. त्यामुळे परिस्थिती कोणतीही व कशीही असली तरी योग्य वेळी निर्णय घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT