Fashion Saam Tv
लाईफस्टाईल

Fashion Tips: पारंपरिक वेअरसोबत अशा प्रकारच्या पोटली बॅग कॅरी करा,की लोक बघतचं राहतील

Fashion Bag: जेव्हा एखादी स्त्री पारंपरिक ड्रेस घालून तयार होते, तेव्हा ती तिच्या मेकअपपासून ते दागिन्यांपर्यंत सर्व काही विचारपूर्वक निवडते.

Saam Tv

जेव्हा एखादी स्त्री पारंपरिक ड्रेस घालून तयार होते, तेव्हा ती तिच्या मेकअपपासून ते दागिन्यांपर्यंत सर्व काही विचारपूर्वक निवडते. मेकअप आणि ज्वेलरी व्यतिरिक्त आता मॅचिंग पर्स नेण्याचा ट्रेंड आहे.  जरी पर्स आणि बॅग प्रत्येक ड्रेस बरोबर चांगल्या दिसतात. परंतु जेव्हा पारंपरिक ड्रेसचा विचार केला जातो तेव्हा बॅग नेहमीच सुंदर दिसते.

आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रकारचे फॅब्रिक आणि वर्क असलेले पोटली बॅग मिळते. तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही ते निवडू शकता. अनेक महिलांना पारंपारिक ड्रेस सोबत कुठल्या प्रकारची पोटली बॅग घ्यावी ते समजत नाही. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

१.योग्य रंगाची निवड

तुमच्या ड्रेसशी जुळणाऱ्या पारंपारिक ड्रेससह पोटली बॅगच्या रंगाची निवडा करा. जर तुमचा ड्रेस खूप कलरफुल असेल तर साध्या रंगाची पोटली बॅग चांगली दिसेल, तर कलरफुल पोटली बॅग साध्या ड्रेससोबत आकर्षक दिसेल.

२. योग्य फॅब्रिक निवडणे

पारंपारिक ड्रेससोबत नेण्यासाठी अनेक प्रकारच्या पोटली बॅग बाजारात उपलब्ध आहेत.  त्यांचे फॅब्रिक्स देखील बरेच वेगळे असतात.  बहुतेक पोटली बॅग रेशीम, ब्रोकेड, भरतकाम, मखमली आणि ज्यूटमध्ये बनवल्या जातात.  सिल्क आणि जरीच्या पिशव्या पारंपारिक ड्रेस सोबत छान दिसतात. 

३. योग्य भरतकाम

जर तुमचा ड्रेस एम्ब्रॉयडरी किंवा जास्त वर्क केलेला असेल तर तुमच्या पोटली बॅगमध्ये साधी असावी.  याउलट, जर तुमचा ड्रेस साधा असेल तर एम्ब्रॉयडरी किंवा मणींनी भरलेली पोटली घ्या. यामुळे तुमचा लूक क्यूट होईल.

४. योग्य आकार

पोटली बॅग खरेदी करताना तिच्या आकाराकडे विशेष लक्ष द्या. लहान पोटली बॅग ही फिट ड्रेस बरोबर चांगली दिसते, तर मोठी पोटली पिशवी सैल कपड्यांसह चांगली दिसते.

५. प्रसंगानुसार निवड करा

लग्न, सण किंवा इतर विशेष प्रसंगी पोटली बॅग निवडताना कोणता कार्यक्रम आहे हे लक्षात घ्या. एम्ब्रॉयडरी केलेले असो किंवा चमकदार मणींनी भरलेली अश्या पोटली बॅग लग्नकार्य साठी योग्य आहेत.  हलक्या रंगाच्या आणि साधी पोटली  बॅग साध्या कार्यक्रमांसाठी चांगल्या दिसतात.

Edited by - अर्चना चव्हाण

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT