Saam Tv
रकूल सिंग ही तिच्या फिटनेस, निरोगी आयुष्य आणि चमकदार त्वचेमुळे बऱ्याच लोकांची आवडती प्रेरणा ठरत आहे.
रकूल सिंगच्या डाएट प्लान आणि सुंदरतेमागील रहस्य जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे पाहूया.
रकूल दिवसाची सुरुवात कोमट पाणी, लिंबू आणि मध यांसह करते. मग ग्रीन ज्यूस किंवा स्मूदी घेते.
प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की अंडी, ओट्स किंवा अवोकाडो टोस्ट याचा ती नाश्ता करते.
भरपूर भाज्या, डाळ, ब्राऊन राईस किंवा क्विनोआ याच पदार्थांचा समावेश ती आहारात करते.
सुकामेवा, फळे किंवा ग्रीन टी हे मुख्य आणि शरीरासाठी आवश्यक पदार्थ रकूल संध्याकाळच्या नाश्त्यात अॅड करते.
हलकं आणि पचायला सोपं, जसे की सूप, भाज्या किंवा ग्रिल्ड फिश असा पौष्टीक आहार करून रकूल तिचा डाएट फॉलो करते.
रकूल योगा, वेट ट्रेनिंग, कार्डिओ, आणि पिलाटेसचा समावेश असलेल्या एक सशक्त वर्कआउट रूटीनचे पालन करते. ती फिटनेससाठी दररोज किमान १ तास व्यायाम करते.
भरपूर पाणी पिणे हे तिच्या चमकदार त्वचेसाठी महत्त्वाचे आहे. ती घरगुती उपाय जसे की बेसन, दही, आणि हळदीचा फेस मास्क वापरते. रकूल नेहमी सनस्क्रीन वापरण्यावर भर देते.
NEXT: श्री हनुमान पृथ्वीवर किती दिवस राहणार? नविन वर्षात काय होणार?