Car Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Car Care Tips : कारमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवताय? चुकूनही दुर्लक्ष करू नका

Overloading Care : वाहनांमुळे आपण इतर ठिकाणी सहज फिरू शकतो. कुठेही जायचं झालं की, लगेच कार काढून बाहेर जाता येते. अशा स्थितीत अनेक वेळा असे घडते की, बहुतांश लोक कारमध्ये बसताना त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात किंवा जास्त सामान ठेवतात.

Shraddha Thik

Car Care :

वाहनांमुळे आपण इतर ठिकाणी सहज फिरू शकतो. कुठेही जायचं झालं की, लगेच कार काढून बाहेर जाता येते. अशा स्थितीत अनेक वेळा असे घडते की, बहुतांश लोक कारमध्ये बसताना त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात किंवा जास्त सामान ठेवतात. परंतु असे करणे कारसाठी चुकीचे ठरू शकते.

नुकसान होऊ शकते

कारमध्ये जास्तीचे सामान असल्याने अनेक गैरसोयी होतात. उदाहरणार्थ, जर कारमध्ये जास्त प्रवासी बसले तर प्रवास (Travel) करणे कठीण होते आणि कार चालवणे देखील कठीण होते, तर मागच्या डिक्कीमध्ये जास्त सामान ठेवल्यास देखील समस्या उद्भवू शकतात.

कारच्या आतला भाग

साहजिकच कारच्या (Car) क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा माणसे बसवली तर त्याचा परिणाम वाहनावरही होतो. कारमध्ये बसवलेले चेसिस केवळ मर्यादित वजन वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. अशा स्थितीत त्यावर जास्त भार पडल्यास नुकसान होण्याची शक्यता वाढते.

टायर होण्याची शक्यता

कोणत्याही वाहनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची चाके आणि कोणत्याही कारमध्ये जास्त वस्तू ठेवले किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले तर चाके कमजोर होतात आणि त्यांची लाईफ सुद्धा कमी होऊ शकते. ओव्हरलोडिंगमुळे टायर लवकर खराब होतात.

इंजिन आणि सस्पेंशन

आवश्यकतेपेक्षा जास्त लोक वाहनात बसल्यामुळे सस्पेंशनवर दबाव वाढतो. त्यामुळे सस्पेंशन बिघडण्याचा किंवा तुटण्याचा धोका असतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनात जास्त सामान ठेवणे किंवा जास्त लोक बसणे याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. कार ओव्हरलोड केल्याने त्याचे इंजिन खराब होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

SCROLL FOR NEXT