Indian Railways Ticket Rules:
Indian Railways Ticket Rules:Saam Tv

Railway Rules: रेल्वेत कोणत्या वयोगटातील मुले करू शकतात मोफत प्रवास, जाणून घ्या नियम

Indian Railways Ticket Rules: कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत रेल्वे प्रवास करता येतो? याचबद्दल रेल्वेचे काय आहेत नियम, ते जाणून घेऊ...
Published on

Indian Railways Ticket Rules:

भारतात सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. देशातील एक कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायचं असो किंवा शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असो, सामान्यांसाठी प्रवास करण्याचं देशातील सर्वात जलद साधन म्हणजे भारतीय रेल्वे आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी गाड्या चालवते. तुम्हाला हवे असल्यास या गाड्यांमधून तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानीही पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला आधी रेल्वेचे तिकीट बुक करावे लागेल. असे अनेक मार्ग आहेत जिथे रेल्वेचे तिकीट लवकर मिळत नाही. यातच तुम्ही घरबसल्या IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Indian Railways Ticket Rules:
Petrol Diesel Rate (7th Feb 2024): कच्च्या तेलाच्या भावात घसरण, इंधनाचे नवे दर जाहीर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

मात्र अनेक वेळा जेव्हा लोक आपल्या मुलांना सोबत घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न असतो की, कोणत्या वयापर्यंत मुलांना मोफत रेल्वे प्रवास करता येतो? याचबद्दल रेल्वेचे काय आहेत नियम, ते जाणून घेऊ... (Latest Marathi News)

पहिला नियम: भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीबाबत नियम बनवले आहेत. त्यातील एक म्हणजे मुलांसाठी मोफत तिकीट. नियमानुसार एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना रेल्वेने मोफत प्रवास करता येतो.

Indian Railways Ticket Rules:
Board Exam Tips: आजच बदला या 5 सवयी, बोर्डाच्या परीक्षेत कराल टॉप

दुसरा नियम: रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखाद्याच्या मुलाचे वय 5 ते 12 वर्षे दरम्यान असेल आणि अशा मुलाला रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर या वयोगटातील मुलांसाठी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मुलासाठी रेल्वेत आरक्षित सीट नको असेल तर तुम्ही अर्धे तिकीट खरेदी करू शकता.

दरम्यान, तुम्हाला हे माहित असं गरजेचं आहे की, 5-12 वर्षे वयोगटातील मुलांची हाफ तिकीट काढल्याने त्यांना बसायला वेगळी सीट मिळत नाही. त्यांना प्रवासादरम्यान आपल्या पालकांसोबत बसावे लागते. तसेच जर तुमच्या मुलाचे वय 5-12 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला त्यांच्यासाठी बर्थ बुक करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या मुलासाठी पूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल आणि त्यासाठी पूर्ण भाडे द्यावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com