Cancer Detection Test Saam tv
लाईफस्टाईल

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Cancer patients treatment : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर वेळेत उपचार मिळाले नाहीत तर रुग्णाचा जीव जातो. मात्र कॅन्सरचं वेळेत निदान करण्यासाठी आयआयटी कानपुरने कॅन्सरचं झटपट निदान कऱणाऱ्या डिव्हाईसचा शोध लावलाय. हे डिव्हाईस नेमकं कसं काम करतं? या डिव्हाईसची किंमत किती? त्याबरोबरच हे डिव्हाईस कधीपर्यंत बाजारात येणार? याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.....

Vishal Gangurde

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : कॅन्सर या आजाराचं नाव जरी ऐकलं तरी हृदयाचा थरकाप उडतो...आणि या आजारात सर्वात मोठं आव्हान असतं ते वेळेत निदान होण्याचं. काऱण निदान होईपर्यत कॅन्सर रुग्णाच्या शरीरात पसरलेला असतो. मात्र कॅन्सरचं वेळेत निदान झालं तर रुग्णाचा जीव वाचवता येतो. नेमकं हेच डोळ्यासमोर ठेवून आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी माऊथ कॅन्सरचं झटपट निदान करणाऱ्या डिव्हाईस तयार केलंय. त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचं वेळेत निदान करणं शक्य होणार आहे. मात्र हे डिव्हाईस कसं काम करतं? पाहूयात...

1 मिनिटात कॅन्सरचं निदान

टूथब्रशच्या आकाराच्या डिव्हाईसमध्ये हाय क्वॉलिटी कॅमेरा आणि एलईडीचा वापर करण्यात येतो. हे डिव्हाईस मोबाईल, टॅबलेट आणि आयपॅडला कनेक्ट करता येतं. कॅमेरा तोंडातील पोटो घेऊन त्याचं विश्लेषण करून रिपोर्ट पाठवतो. डिव्हाईस माऊथ कॅन्सरची स्टेज आणि निदान करते. हे डिव्हाईस पॉवर बॅकअपसह आरोग्याची ट्रॅकिंग हिस्ट्री जमा करते. डिव्हाईसची अचूकता 90 % इतकी आहे. चाचणी करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. एक डिव्हाईसने किमान 5 लाख चाचण्या करणं शक्य आहे.

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जयंत कुमार सिंह यांच्या टीमने 6 वर्षाच्या संशोधनानंतर या पोर्टेबल डिव्हाईसचा शोध लावलाय.. हे डिव्हाईस स्कॅन जिनी या कंपनीने बनवलंय. या डिव्हाईसची किंमत दीड ते 2 लाख रुपये असणार आहे. हे डिव्हाईस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमुळे मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : २४ वर्षांच्या तरुणीनं जाळं टाकलं, मुंबईचा बिल्डर अडकला; लॉजवर बोलावलं, आरेच्या जंगलात नेऊन...

Maharashtra Live News Update: सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

SUV 2026: फीचर्स फुल्ल, स्टाइल कमाल! मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज 5 दमदार मिड–साईज SUV; खासियत ऐकून थक्क व्हाल

Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

Solapur News: सूचना एक कानानं ऐकली दुसऱ्या कानाने सोडली; आगार प्रमुख 'ऑन द स्पॉट सस्पेंड'

SCROLL FOR NEXT