Period delay pills saam tv
लाईफस्टाईल

Period delay pills: मासिक पाळी पुढे ढकलण्याचा गोळ्या जीवघेण्या ठरू शकतात का? तज्ज्ञांनी सांगितलं, कसा वाढतो ब्लड क्लॉटचा धोका

How Safe Are Pills To Delay Periods: आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक महिला प्रवासादरम्यान, सण-समारंभात किंवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या (Period Delay) गोळ्या घेतात. या गोळ्या सोयीस्कर असल्या तरी, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात

Surabhi Jayashree Jagdish

  • पीरियड्स थांबवणाऱ्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

  • गोळ्यांमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

  • DVT म्हणजे शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे.

आपल्या आसपास अनेक महिला असतात ज्या कधी तरी खास प्रसंगासाठी किंवा महत्वाच्या दिवशी पीरियड्स थांबवण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठ गोळ्या घेतात. बर्‍याचदा या गोळ्या त्या डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अशा गोळ्या खूप धोकादायक ठरू शकतात?

एका पॉडकास्टमध्ये व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. विवेकानंद यांनी सांगितलेलं एक प्रकरण खूप धक्कादायक आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये १८ वर्षांची इंजिनिअरिंग शिकणारी मुलगी आली होती. तिला पाय आणि मांडीमध्ये प्रचंड वेदना होत होत्या. तपासणीदरम्यान तिनं सांगितलं की, तिच्या घरी पूजा असल्यामुळे ती ३ दिवसांपासून पीरियड्स थांबवणारी औषधं घेत होती.

डॉक्टरांनी तपासणी केली आणि तिच्या कुटुंबाला सांगितलं की तिला डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) झालं आहे आणि तिला लगेच अॅडमिट करावं लागेल. पण तिच्या घरच्यांनी ते नाकारलं. रात्री उशिरा इमर्जन्सी वॉर्डमधून फोन आला की त्या मुलीला श्वास घेण्यास त्रास होतोय. दुर्दैवानं काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. यातून स्पष्ट होतं की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पीरियड्स थांबवणाऱ्या गोळ्या घेऊ नयेत.

या औषधांनी महिलांना काय त्रास होतो?

स्त्रिरोग आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितलं की, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी आजकाल बऱ्याच महिला औषधांचा वापर करतात. यामध्ये दोन प्रकारच्या गोळ्या असतात. ज्यामध्ये combination pills आणि progestin pills यांचा समावेश असतो. या गोळ्यांचा वापर प्रत्येक महिलेसाठी धोकादायक असतोच असं नाही. पीरियड्स थांबवणाऱ्या किंवा पुढे ढकलणाऱ्या औषधांमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे काही महिलांना अनियमित पाळी, अचानक वजन वाढणे, मूड स्विंग्स किंवा चिडचिड यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते.

डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?

अशा औषधांचा सुरक्षित वापर फक्त योग्य तपासणी, वैयक्तिक आरोग्याचा इतिहास आणि जोखीम घटक तपासल्यानंतरच करता येतो. त्यामुळे डॉक्टरांनीच कोणाला, किती डोस आणि किती दिवस औषध द्यायचं हे ठरवावं. ज्या महिलांना उच्च रक्तदाब, डायबिटीस, स्थूलपणा , धूम्रपानाची सवय किंवा आधीपासून हार्मोनल समस्या आहेत, त्यांनी कधीही मनाने अशी औषधे घेऊ नयेत. अशा महिलांसाठी ही गोळ्या अधिक धोकादायक ठरू शकतात, असंही डॉ. राजपूत यांनी सांगितलंय.

पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मानसी शर्मा सांगतात की, स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स असतात आणि त्यावरच त्यांच्या पाळीचं चक्र अवलंबून असतं. मात्र जेव्हा पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात तेव्हा त्या गोळ्या याच हार्मोन्सवर परिणाम करतात त्यामुळे हार्मोन्सचे हे चक्रावर बिघडते. पाळी लांबविणाऱ्या पर्यायांची निवड करण्यापूर्वी तुमच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी जाणून घेणे गरजेचं आहे.

डॉ. शर्मा पुढे म्हणाल्या की, या गोळ्यांच्या सेवनाने अतिरिक्त रक्तस्त्राव होणे, यकृतावर सूज येणे, पायापासून मेंदूपर्यंत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता या प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. बऱ्यावेळा महिला ज्या गोळ्या खातात त्यावरील अटी व नियम वाचत नाहीत. त्यामध्ये स्पष्टपणे लिहलेलं असत की, या गोळ्या खाल्ल्याने काय परिणाम होतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशा पर्यायांचा वापर करु नका.

डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणजे काय?

जेव्हा शरीरातील खोलवरच्या शिरांमध्ये ब्लड क्लॉट तयार होतो, तेव्हा त्याला DVT म्हणतात. हे क्लॉट प्रामुख्यानं पायाच्या खालच्या भागात, मांडीमध्ये किंवा पेल्विसमध्ये होतात. पण कधी कधी हे हात, मेंदू, आतडी, किडनी आणि लिव्हरमध्येही होऊ शकतात. रक्ताची गुठळी झाली की रक्तप्रवाह थांबतो आणि गंभीर त्रास होतो.

DVT ची लक्षणं

DVT हा गंभीर आजार आहे, पण त्याची लक्षणं सुरुवातीला लहानसहान वाटू शकतात. काही वेळा अचानक तीव्र लक्षणं दिसू शकतात.

  • पाय किंवा हात सुजणे

  • सूजलेल्या भागात वेदना जाणवणं, विशेषतः चालताना किंवा उभं राहिल्यावर.

  • सूजलेल्या जागेचा रंग लालसर किंवा तपकिरी होणं. त्वचा गरम जाणवणे.

  • पोट किंवा कंबरेत वेदना

  • मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यास अचानक डोकेदुखी, झटके, किंवा फिट्स येणं.

पीरियड्स थांबवणाऱ्या गोळ्या का धोकादायक आहेत?

त्या हार्मोन्सवर परिणाम करून आरोग्याला धोका निर्माण करतात.

DVT म्हणजे काय?

शरीरातील खोल शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे म्हणजे DVT.

पीरियड्स पुढे ढकलणाऱ्या गोळ्यांचे सामान्य दुष्परिणाम कोणते?

अनियमित पाळी, मूड स्विंग्स, वजन वाढ आणि चिडचिड.

कोणत्या महिलांनी गोळ्या घेणे टाळावे?

उच्च रक्तदाब, डायबिटीस, स्थूलपणा असलेल्या महिलांनी टाळावे.

DVT ची मुख्य लक्षणे कोणती?

पायात सूज, वेदना, त्वचेचा रंग बदल आणि गरमपणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT