Lips Cancer: ओठांवर कर्करोगाचा धोका? काय कारणे आहेत आणि ती लक्षणे कशी ओळखावी? वाचा सविस्तर

Mouth Cancer: ओठांचा कर्करोग वेळेत ओळखण्यासाठी त्याची सुरुवातीची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया, जेणेकरून योग्य वेळी प्रतिबंधक उपाय आणि उपचार घेता येतील.
Lips Cancer
Lips Cancerfreepik
Published On

ओठांचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगाचा एक प्रकार असून तो प्रामुख्याने ओठांच्या खालच्या भागात दिसून येतो. हा आजार ओठांच्या पेशींमध्ये असामान्य वाढ झाल्याने होतो आणि सुरुवातीला सौम्य दिसत असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.

ओठांचा कर्करोग होण्यामागे प्रमुख कारणे म्हणजे धूम्रपान, तंबाखू चघळणे, मद्यपान आणि सूर्याच्या अतिनील किरणांचा जास्त संपर्क. योग्य वेळी लक्षणे ओळखून उपाययोजना केल्यास हा आजार रोखता येऊ शकतो. त्यामुळे ओठांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि त्याची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळेत निदान व उपचार करून गंभीर परिणाम टाळता येतील.

Lips Cancer
आता तुम्ही WhatsApp वर पण पाहू शकता Instagram रील, जाणून घ्या नवीन ट्रिक

सूर्यप्रकाशात दीर्घकाळ सनस्क्रीनशिवाय राहिल्यास त्वचेवर परिणाम होऊन कर्करोग होऊ शकतो. मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) संसर्गामुळेही हा आजार होण्याची शक्यता असते. तोंडाची अस्वच्छता, खराब दात आणि हिरड्यांमुळेही हा धोका वाढतो. तसेच, कुटुंबात पूर्वी तोंडाचा कर्करोग झाल्यास अनुवंशिकतेमुळे त्याचा प्रभाव पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Lips Cancer
High Blood Pressure: उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ५ नैसर्गिक फळे, आरोग्यासाठी फायदेशीर पर्याय

ओठांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे:

जर लक्षणे वेळेत ओळखली गेली तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. ओठांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे जाणून घ्या

- ओठांवर वारंवार फोडे किंवा जखमा होत असल्यास आणि ते लवकर बरे होत नसल्यास सतर्क राहा.

- ओठांच्या त्वचेवर लाल किंवा पांढरे डाग दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

- ओठांवर गाठ येणे किंवा सूज जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

- बोलताना किंवा खाण्याच्या वेळी अडथळा जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करा.

- ओठ आणि आसपासच्या भागात सुन्नपणा किंवा मुंग्या आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- ओठांचा रंग अचानक बदलल्यास किंवा जाड होल्यास, त्वरित वैद्यकीय तपासणी करा.

ओठांचा कर्करोग रोखण्याचे मार्ग:

तोंडाचा कर्करोग रोखण्यासाठी, जीवनशैलीत काही बदल आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे.

- तंबाखू आणि मद्यपान ओठांच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहेत, त्याचा वापर टाळावा.

- सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन, लिप बाम आणि टोपी वापरा.

- तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी दररोज दात आणि तोंड स्वच्छ करा.

- निरोगी जीवनासाठी फळे आणि भाज्यांचा समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे.

- नियमित तपासणी करा आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com