Vastu tips For Buying New Home : अक्षय्य तृतीयेला बऱ्याच लोकांचा घर खरेदी करण्याचा विचार असतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या मुहूर्तावर घर खरेदी हे शास्त्रानुसार शुभ मानले जाते. परंतु घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करून घर (Home) विकत घेतल्यास भरपूर नफा होतो तसेच देवी लक्ष्मीचा तिथे वास टिकून राहातो असे म्हटले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, गृहप्रवेश व्यतिरिक्त, अनेकांना त्यांच्या घरांसाठी नवीन घरे बांधणे किंवा त्याला पुन्हा नव्यासारखे करायला आवडते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वच्छतेची (Clean) नेहमी काळजी (Care) घेतली पाहिजे.
1. सूर्यकिरण हे सकारात्मक (Positive) ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत. म्हणूनच नवीन घर घेताना सूर्याची किरणे घराच्या आत पोहोचतील याची काळजी घ्या.
2. घराच्या मुख्य दरवाज्यासमोर कोणतेही मंदिर नसावे, विजेचा खांब नसावा, ही देखील एक अतिशय महत्त्वाची आणि विशेष गोष्ट आहे. घराचे स्नानगृह ईशान्य कोपर्यात असावे. हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी असेल. घराच्या बाल्कनीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी.
3. स्वयंपाकघर कधीही दक्षिण-पश्चिम दिशेला नसावे. या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घराची बाल्कनी नेहमी ईशान्य दिशेला असावी. घराची दक्षिण-पूर्व दिशा स्वयंपाकघरासाठी उत्तम मानली जाते.
4. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पूजा करताना श्लोकांचा जप करा, आरती करा आणि घंटा वाजवा.
5. मास्टर बेडरूम नेहमी नैऋत्य कोनात बनवावी अन्यथा घरातील विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.