Buldhana Tourist Place saam tv
लाईफस्टाईल

Buldhana Tourist Place : पांढरेशुभ्र धबधबे, अभयारण्य अन् बरंच काही ; बुलढाण्यातील या स्थळांना नक्की भेट द्या

Buldhana Travel Place : सुट्टीचा आनंद एन्जाॅय करण्यासाठी बुलढाणा शहरातील प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या. बुलढाणा शहरात पर्यटकांना अनेक गोष्टी पाहायला मिळतील. त्याचबरोबर बुलढाणा शहराचा अनुभव सुध्दा घेता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वच नागरिकांना सुट्टीचा पुरेपुर आनंद लुटायचा असतो. रोजच्या जीवनातील धावपळ करुन सर्वाना थोडासा ब्रेक हवा आहे. त्यामुळे पर्यटक कधी- कधी निसर्गाच्या सानिध्यात असलेली ठिकाणे शोधत असतात. निसर्गाचा अनुभव सर्वांच्या मनाला प्रसन्न करत असतो. त्यामुळे पर्यटकांच्या त्या ठिकाणांच्या आठवणी सुध्दा बनतात. जर तुम्ही सुध्दा अशाच शहराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी बुलढाणा शहरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेवून आलो आहोत. या माहितीमुळे तुमचा बुलढाणा शहरातील प्रवास अगदी आनंदी होणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना बुलढाणा शहराला एक्सप्सेर सुध्दा करता येणार आहे. जर तुम्ही एक दिवसाच्या ट्रिपचा प्लान करत असाल तर तुमची ही ट्रिप खूप खास ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा शहर सर्व पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे. बुलढाणा शहर मुंबई शहरापासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. बुलढाणा शहरात पर्यटकांना अनेक नैसर्गिक, धार्मिक पर्यटन स्थळे पाहायला मिळतील. काही पर्यटक बुलढाण्या शहराला भेट देण्यासाठी एक दिवसाची पिकनिक म्हणून सुध्दा येत असतात. या शहराला भेट देण्याचा उत्तम काळ नोव्हेंबर ते मार्च आहे. त्याचबरोबर पर्यटकांना खूप काही गोष्टी एक्सप्लोर करता येईल. पर्यटक बुलढाणा शहराला भेट देण्यासाठी तिन्ही मार्गानीं जाऊ शकता. पर्यटकांचा बुलढाणा शहरातील फिरण्याचा अनुभव खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

अंबाबरवा अभयारण्य

बुलढाणा शहरातील अंबाबरवा अभयारण्य सर्वात सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहे. या अभयारण्यला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांना या अभयारण्यात वाघ, सिंह,चित्ता आणि जंगलात राहणारे इतर वन्य प्राणी पाहायला मिळतील. अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा शहरापासून फक्त १२५ किमी अंतरावर आहे. पर्यटकांसाठी अंबाबरवाला भेट देण्याचा उत्तम काळ पावयाळ्याचा सुरुवातीचा महिना आणि उन्हाळ्याचा काळ योग्य आहे.

गजानन महाराज मंदिर

बुलढाणामधील गजानन महाराज मंदिर एक धार्मिक अभ्यागतांसाठी ओळखले जाते. या मंदिराला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. गजानन महाराज मंदिर बुलढाणा शहरात शेगाव येथे आहे. या मंदिराला भेट देताना पर्यटकांना दोन प्रवेशद्वारे पाहायला मिळतील. त्याचबरोबर पर्यटकांना या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न आणि शांत वाटेल. जर तुम्ही सुध्दा कधी बुलढाणा शहराला भेट देण्याचा विचार करत असाल तर गजानन महाराज मंदिराला नक्की भेट द्या.

आनंद सागर

बुलढाणा शहरातील आनंद सागर हे शेगाव गावात वसलेले एक पर्यटन स्थळ आहे. आनंद सागर पर्यटन स्थळ पाण्याची टंचाई असल्यामुळे श्री गजानन महाराज संस्थने बांधले होते. हे पर्यटन स्थळ अनेक निसर्ग प्रेमीचे आवडते ठिकाण बनले आहे. पर्यटकांना आनंद सागराला भेट देताना निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल.

राजूर घाट

बुलढाणा शहरातील राजूर घाट मलकापूर रोडवर वसलेला आहे. पर्यटकांना या घाटात विविध मंदिरे, नद्या, झाडे पाहायला मिळतील. त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गाचा सुंदर अनुभव घेता येणार आहे. राजूर घाटामध्ये आणखी इतर पर्यटन स्थळे सुध्दा आहेत. पर्यटकांना व्यंकटगिरी बालाजी आणि हनुमानाचे मंदिर पाहायला मिळेल. राजूर घाट त्याच्या धार्मिकआणि नैसर्गिक सौंदर्यामुळे लाखो पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी राजूर घाट एक अप्रतिम ठिकाण आहे.

लोणार सरोवर

बुलढाणा शहरातील खाऱ्या पाण्याच्या सरोवराला लोणार सरोवर म्हणून ओळखले जाते. हा तलाव पाहण्यसाठी पर्यटकांनी बुलढाणा शहराला नक्की भेट द्या. या तलावाला पाहण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. लोणार सरोवर एक नैसर्गिक पर्यटन स्थळ असून पर्यटकांच आवडतं ठिकाण बनलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulaabi Movie: श्रृती मराठेच्या चित्रपटाची 'गुलाबी' हवा; रिलीज होण्याआधीच कोट्यावधी रूपये कमावले

Viral Video: मुजोरी! भक्ताला सुरक्षारक्षकांची मारहाण, मंदिरातील संतापजनक व्हिडीओ व्हायरल

Mohammed Shami: अखेर शमीला संघात स्थान मिळालं! या दिवशी उतरणार मैदानात

'या' फोटोमध्ये लपलाय एक मोबाईल; ९९ टक्के लोकं शोधू शकले नाहीत!

Governmemt Job: सरकारी नोकरी अन् ८१००० रुपये पगार; BRO मध्ये ४६६ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT