Shreya Maskar
तुम्ही कुटुंबांसोबत किंवा तुमच्या जोडीदारासोबत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करत असाल तर, या बजेट फ्रेंडली ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
हिमाचल प्रदेशातील तोश गाव हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
हिमाचल प्रदेशातील पार्वती खोऱ्यात हे नयनरम्य ठिकाण वसलेले आहे.
येथे तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत, धबधबे आणि तलाव पाहायला मिळतील.
दरवर्षी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लाखो पर्यटक येथे येतात.
तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता.
येथे कुटुंबासोबत ट्रीप प्लान करत असाल तर, येथे राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
तुम्हाला येथे निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल.
हिमाचल प्रदेशात पावसाळ्यात खेड्यापाड्यापासून दऱ्याखोऱ्यांपर्यंत दाट धुके पसरलेले पाहायला मिळेल.
हा अद्भुत नजारा तुमच्या मनाला भुरळ पाडेल.