Chest Enlargement In Males Saam Tv
लाईफस्टाईल

Chest Enlargement In Males : पुरुषांमधील वाढलेल्या छातीचा आकार ठरतोय नैराश्यास कारणीभूत

How To Get Rid Of Man Chest Size: बरेच लोक छातीचा वाढलेला आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात. गेल्या वर्षभरात ३० ते ३४ पुरूषांनी शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gynecomastia : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही स्तनांसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पुरुषांमध्ये छातीचा आकार वाढणे किंवा गायनेकोमास्टिया सामान्यतः 21-40 वयोगटात दिसून येते आणि यापैकी बरेच लोक स्तनाचा वाढलेला आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात. गेल्या वर्षभरात ३० ते ३४ पुरूषांनी शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्राचे डॉ. पंकज पाटील कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन म्हणतात की, केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही कॉस्मेटिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांमधील गायकोमास्टियाची थिती हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवू शकते.

यामुळे स्तनाच्या (Breast) ऊतींचे प्रमाण वाढते, जसे की कमी टेस्टोस्टेरॉन किंवा इस्ट्रोजेनची पातळी जास्त असेल तर पुरुषांमधील (Men) स्तनाच्या ऊती फुगतात आणि छाती आकाराने मोठी दिसू लागते. पण लठ्ठपणा, स्टिरॉइडचा वापर, काही औषधे, किडनीचा आजार किंवा किडनी निकामी होणे, यकृताचे आजार (Disease) आणि थायरॉईडच्या समस्यांमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते.

21 ते 40 वयोगटातील पुरुषांना ही गंभीर समस्या भेडसावत आहे. 70% पुरुष लोकसंख्येला स्तनाचा आकार वाढल्याची म्हणजेच गायकोमास्टिया समस्या सतावते आहे. गेल्या वर्षी या समस्येवर मात करण्यासाठी 30 ते 34 शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

या स्थितीमुळे पुरुषांना मानसिक त्रास होतो आणि त्यामुळे त्यांना ताणतणावाचाही सामना करावा लागू शकतो. मोठ्या आकाराच्या स्तनांमुळे अनेक पुरुष उदासीन, तणावग्रस्त, निराश, चिडचिडे, एकलकोंडेपणा सारख्या समस्यांना तोंड देतात आणि त्यांचा आत्मविश्वास देखील मंदावू शकतो. त्यांना शरीराच्या प्रतिमेच्या समस्या भेडसावू लागतात आणि ते सतत स्वतःवर टीका करतात.

बहुसंख्य पुरुष त्यांच्या स्तनांचा आकार लपविण्याकरिता सैल कपडे किंवा गडद रंगाच्या शर्टचा वापर करतात. पुरूषांच्या स्तनांचा वाढलेला आकार कमी करण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीराच्या नकारात्मक प्रतिमेमुळे अनेक पुरुषांना तणावाचा सामना करावा लागतो. वजन कमी करणे किंवा तज्ज्ञांनी दिलेली औषधे घेणे हे स्तनांचा आकार कमी करण्यास मदत करू शकते. परंतु शस्त्रक्रिया हा या आजारावर कायमस्वरूपी मार्ग आहे.

मनात कोणतीही शंका बाळगता पुरुष स्तनाचा आकार कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे. आता या शस्त्रक्रियेला देखील मान्यता मिळाली आहे. वजन कमी करणे किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करणे हे केवळ छातीची चरबी कमी करण्यास मदत करू शकते परंतु गायकोमास्टिया संबंधीत ग्रंथी आणि चरबी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.

स्तन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान, एक प्लास्टिक सर्जन लिपोसक्शन तसेच संबंधीत ग्रंथी व चरबी काढून टाकतो. ही प्रक्रिया जोखीममुक्त आहे कारण याचे कोणतेही मोठे दुष्परिणाम नाहीत. शस्त्रक्रिया स्तनाचा आकार कमी करण्यास आणि आत्मविश्वास आणि शरीराची प्रतिमा सुधारण्यास मदत करू शकते. जे पुरुष त्यांच्या स्तनांचा आकार कमी करू पाहत आहेत त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया नक्कीच वरदान ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT