Breast Cancer  Saam TV
लाईफस्टाईल

Breast cancer prevention:'या' एका साध्या आणि सोप्या उपायाने टाळता येतो ब्रेस्ट कॅन्सर; 10% ते 25% धोका कमी होत असल्याचं अभ्यासातून समोर

Reduce breast cancer risk naturally: स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये Breast Cancer हा सर्वात सामान्य मानला जातो. तितकाच हा आजार गंभीर देखील आहे. या जीवघेण्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसोबतच, जीवनशैलीत (Lifestyle) केलेले काही साधे-सोपे बदल अत्यंत प्रभावी ठरू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

स्तनाचा कॅन्सर हा भारतीय महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा कॅन्सर आहे. राष्ट्रीय कॅन्सर नोंदणी कार्यक्रम (NCRP) आणि संबंधित अहवालांनुसार, स्तनाच्या कॅन्सरची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतेय. महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी सुमारे २६% प्रकरणं केवळ स्तनाच्या कर्करोगाची असतात. २०१९ ते २०२३ या ५ वर्षांत राज्यात स्तन कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे २८% नी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे स्तनाच्या कॅन्सरला कारणीभूत घटकांवर नियंत्रण ठेवता येतं. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ज्या महिला नियमितपणे शारीरिकरित्या सक्रिय राहतात, त्यांच्यामध्ये स्तनाच्या कॅन्सरचा धोका १०% ते २५% पर्यंत कमी होतो.

व्यायामाचा अभाव हे अनेक रोगांचं मूळ कारण आहे. नियमित व्यायाम केल्याने केवळ वजन नियंत्रणात राहत नाही तर ते हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, नियमित मध्यम व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये कॅन्सरचा धोका १०% ते २५% पर्यंत कमी होतो.

तळेगावच्या टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरच्या रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ ज्योती मेहता यांनी सांगितलं की, ब्रेस्ट कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. शिवाय हा आजार जीवघेणा आजार मानला जातो. मात्र तरीही तो पूर्णपणे अनियंत्रित नाही. योग्य जीवशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहिल्यास आपण या रोगापासून दूर राहू शकतो.

परंतु जीवनशैलीत बदल करण्यासोबतच चाळीशीनंतर नियमितपणे मॅमोग्राफी आणि स्वतः स्तनांची तपासणी करणं आवश्यक आहे. ब्रेस्ट कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी योग्य जीवनशैली हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

SCROLL FOR NEXT