Life expectancy with a single kidney: व्यक्ती एका किडनीवर किती जगते? जाणून घ्या काय काळजी घ्यावी लागते?

How long can a person live on one kidney: एका किडनीवर आयुष्य जगणे पूर्णपणे शक्य आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या शरीरात एकच निरोगी किडनी असेल तर ती दोन्ही किडन्यांचे काम अगदी सहजपणे करू शकते.
Life expectancy with a single kidney
Life expectancy with a single kidneysaam tv
Published On
Summary
  • एक किडनी असली तरी दीर्घायुषी शक्य आहे

  • एक किडनी दोन्हींचे काम करू शकते

  • उच्च रक्तदाब किंवा मधुमेह धोकादायक आहेत

किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. त्या रक्तातील टॉक्सिन पदार्थ बाहेर काढतात. यामुळे शरीरातील द्रवांचं संतुलन राखतात आणि काही महत्त्वाचे हार्मोन्स तयार करतात. सामान्यपणे लोकांना जन्मतः दोन किडनी असतात, पण काही लोकांना जन्मापासूनच एकच किडनी असते.

याशिवाय काही लोक आजार, अपघात किंवा इतर कारणांमुळे आयुष्यात एखाद्या टप्प्यावर एकाच किडनीसह राहतात. अशावेळी प्रश्न पडतो एक किडनी असली तर माणूस किती दिवस जगू शकतो? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Life expectancy with a single kidney
Heart Attack Signs: चेहऱ्यावर 'ही' लक्षणं दिसली तर समजा की हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

एक किडनी असतानाही दीर्घकाळ जगणं शक्य?

अनेकांच्या मनात हा गैरसमज असतो की, एकच किडनी असेल तर आयुष्य कमी होऊ शकतं. पण एक किडनी असतानाही माणूस पूर्णतः निरोगी राहून आयुष्य जगू शकतो. याचं कारण म्हणजे शरीरात असलेली एक किडनी दोन्ही किडनींचं काम करण्यास सक्षम असते. या प्रक्रियेला कम्पेन्सेटरी हायपरट्रॉफी म्हणतात.

याचे सोपे उदाहरण म्हणजे, दरवर्षी हजारो लोक स्वतःची एक किडनी दान करतात आणि उरलेल्या एकाच किडनीच्या आधारावर ते संपूर्ण आयुष्य निरोगीपणे घालवतात. म्हणजेच एक किडनी असणं म्हणजे आजारपण किंवा आयुष्य कमी होणं असं नाही.

Life expectancy with a single kidney
Early symptoms of stroke: स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ३ मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी वेळीच ओळखा लक्षणं

काही अडचणी संभवू शकतात

  • साधारणपणे एक किडनी असलेल्या व्यक्तीला आयुष्यभर कोणतीही मोठी समस्या येत नाही. परंतु काही परिस्थितींमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

  • एकच किडनी दोन्ही किडनींचे काम करत असल्याने त्यावर जास्त ताण येऊ शकतो.

  • जर व्यक्तीला हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

  • काही वेळा माइल्ड प्रोटीन्यूरिया सारखी अवस्था दिसू शकते.

  • या धोक्यांपासून वाचण्यासाठी नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे.

Life expectancy with a single kidney
High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

एक किडनी असताना आरोग्य कसं जपावं?

एकच किडनी असली तरी योग्य काळजी घेतल्यास आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो.

  • पुरेसे पाणी प्या

  • संतुलित आहार घ्या

  • मीठ आणि जास्त प्रोटीन टाळा

  • नियमित व्यायाम करा

  • धूम्रपान टाळा

  • डॉक्टरांची नियमित तपासणी करा

Life expectancy with a single kidney
Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका
Q

एक किडनी असली तर आयुष्य कमी होते का?

A

नाही, एक किडनी असली तरी दीर्घायुषी शक्य आहे.

Q

एक किडनी दोन्हींचे काम कशी करते?

A

कम्पेन्सेटरी हायपरट्रॉफीमुळे ती दोन्हींचे काम करते.

Q

एक किडनी असताना कोणते धोके असतात?

A

उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे धोके असतात.

Q

आहारात काय बदल करावेत?

A

मीठ आणि जास्त प्रोटीन टाळावे.

Q

किडनीचे आरोग्य कसे जपावे?

A

पुरेसे पाणी प्या आणि नियमित तपासणी करा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com