Heart disease symptoms: 'ही' ५ लक्षणं दिसली तर समजा एंजियोप्लास्टी करण्याची आहे गरज; वेळीच टाळा हार्ट अटॅकचा धोका

Signs you need an angioplasty: आजकाल धावपळीच्या जीवनात हृदयविकाराचे (Heart Disease) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी (Plaque) जमा झाल्यास ब्लॉकेज (Blockage) तयार होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
Signs you are fit and healthy
Signs you are fit and healthysaam tv
Published On
Summary
  • छातीत वेदना हे ब्लॉकेजचे संकेत आहेत

  • पायात गोळे येणे हृदयाशी संबंधित असू शकते

  • सतत थकवा हृदयाच्या कमजोरीचे लक्षण आहे

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत अनेक लोक स्वतःची विशेषतः हृदयाची काळजी घेत नाहीत. सततचा ताणतणाव, चुकीचा आहार, धूम्रपान, कमी झोप, व्यायामाचा अभाव हे सर्व घटक आपल्या हृदयाच्या आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम करतात. याच कारणामुळे दरवर्षी जगभरातील लाखो लोक हृदयाच्या आजारांच्या कचाट्याच सापडतात. हृदयविकार केवळ जीवघेणे नसतात, तर ते आपल्या जीवनाची गुणवत्ता देखील कमी करतात.

सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्र खूप प्रगत झालं असून हृदयविकारांच्या उपचारांसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपचार म्हणजे एंजियोप्लास्टी. या प्रक्रियेमुळे लाखो लोकांना नवजीवन मिळालंय. जर वेळेत लक्षणं ओळखता आली तर एंजियोप्लास्टीद्वारे गंभीर हृदयविकार टाळता येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया अशी कोणती 5 लक्षणं आहेत जी दिसली तर एंजियोप्लास्टीची गरज असू शकते.

छातीत दुखणं किंवा एनजायना

जर तुम्हाला वारंवार किंवा चालताना-फिरताना छातीत जळजळ, दडपण किंवा वेदना जाणवत असेल तर ते एनजायनाचं लक्षण असू शकतं. हे तेव्हा होतं, ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंना पुरेसं रक्त मिळत नाही. याचा अर्थ तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असू शकतात. अशा वेळी एंजियोप्लास्टी खूप उपयुक्त ठरते.

Signs you are fit and healthy
Sleep hours by age: तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती तास झोप घेतली पाहिजे?

पायात वेदना किंवा गोळे येणं

चालताना किंवा पायऱ्या चढताना तुम्हाला पायात वेदना, गोळे येणं किंवा जडपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. हे परिफेरल आर्टरी डिसीज (PAD) चं लक्षण असू शकतं. ज्यावेळी पायांच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज होते, तेव्हा स्नायूंना पुरेसं रक्त मिळत नाही आणि त्यामुळे वेदना होतात.

Signs you are fit and healthy
Right Weight For Age : वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? कसं मोजाल वय आणि वजनाचं गणित, पाहा चार्ट

सतत थकवा आणि कमजोरी वाटणं

जर नेहमी थकवा जाणवत असेल, काम करण्याची इच्छा होत नसेल, थोड्या प्रयत्नात श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल किंवा झोपताना अस्वस्थ जाणवत असेल तर हे केवळ अशक्तपणाचं लक्षण नाही. या लक्षणांमागे हृदय नीट कार्य करत नसण्याची शक्यता असते. एंजियोप्लास्टीद्वारे हृदयातील ब्लॉकेज दूर केल्यास रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो.

Signs you are fit and healthy
Right Time To Sleep : उशीरा झोपल्यामुळे हृदयविकाराचा धोका! झोपेची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

ब्लड प्रेशर सतत जास्त राहणं

जर तुमची ब्लड प्रेशर औषधे घेऊनही नियंत्रणात येत नसेल तर हे हृदयविकाराचे संकेत असू शकतं. सातत्याने उच्च रक्तदाबामुळे धमन्या जाड व कडक होतात, ज्यामुळे ब्लॉकेजची शक्यता वाढते. यामुळे हृदयावर जास्त ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत एंजियोप्लास्टीद्वारे रक्तप्रवाह सुधरवणं आणि हृदयावरील ताण कमी करणं महत्त्वाचं असतं.

Signs you are fit and healthy
Diabetes: तुमच्या वयानुसार किती असली पाहिजे ब्लड शुगर लेवल? जाणून घ्या तुमच्या वयासाठी किती प्रमाण योग्य!

हिरड्या सुजणं किंवा रक्त येणं

होय, मसूड्यांच्या आजारांचा आणि हृदयाच्या आरोग्याचा खोल संबंध असू शकतो. जर वारंवार मसूडे दुखत असतील, सुजत असतील किंवा त्यातून रक्त येत असेल, तर हा शरीरातील इन्फेक्शन किंवा सूज असल्याचा संकेत आहे. संशोधनानुसार, मसूड्यांमधून होणारा संसर्ग हृदयाच्या धमन्यांवरही परिणाम करतो, ज्यामुळे ब्लॉकेज आणि हृदयविकारांचा धोका वाढतो.

Signs you are fit and healthy
Sleep needs by age: वयाप्रमाणे झोपेची आवश्यकता बदलते; तुमच्या वयानुसार झोपण्याची योग्य वेळ कोणती?
Q

एंजियोप्लास्टीची गरज कधी भासते?

A

छातीत वेदना किंवा ब्लॉकेज असल्यास गरज भासते.

Q

पायात गोळे येणे हृदयाशी कसे संबंधित आहे?

A

धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यास पायात गोळे येतात.

Q

सतत थकवा हृदयाचा इशारा आहे का?

A

होय, हा हृदयाचा गंभीर इशारा आहे.

Q

ब्लड प्रेशर नियंत्रणात न आल्यास काय करावे?

A

तज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी करावी.

Q

हिरड्यांचा आजार हृदयाला कसा परिणाम करतो?

A

सूज आणि संसर्गामुळे धमन्यांवर परिणाम होतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com