Bone Cancer Saam Tv
लाईफस्टाईल

Bone Cancer : हाडांचा कर्करोग कसा होतो? ५४ व्या वर्षीच्या व्यक्तीवर यशस्वीरित्या बोन मॅरो प्रत्यारोपण

Bone Cancer Causes : मल्टीपल मायलोमा म्हणजेच एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर जो प्लाझ्मा पेशींशी संबंधित कर्करोग म्हणून ओळखला जातो. या मल्टीपल मायलोमाने पिडीत ५४ वर्षीय व्यक्तीवर सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे यशस्वी बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले.

कोमल दामुद्रे

Satara Health News :

मल्टीपल मायलोमा म्हणजेच एक प्रकारचा रक्ताचा कॅन्सर जो प्लाझ्मा पेशींशी संबंधित कर्करोग म्हणून ओळखला जातो. या मल्टीपल मायलोमाने पिडीत ५४ वर्षीय व्यक्तीवर सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे यशस्वी बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले.सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ. विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली टिमने 54 वर्षीय मल्टिपल मायलोमाचे निदान झालेल्या व्यक्तीवर यशस्वी बोनमॅरो प्रत्यारोपण करत रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिले.

रुग्ण श्री नितीन कांबळे (नाव बदलले आहे) हे पेशाने साताऱ्यातील (Satara) शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये त्यांना अचानक पोटात दुखणे आणि पाठदुखीचा त्रास सुरु झाला.

तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पेट सिटी स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये विकृती आढळून आली. त्यांची हाडे आणि त्यांची डाव्या बाजूच्या 8व्या बरगडीत गाठ आढळून आली. तीव्र पाठदुखीमुळे (Back Pain) त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना दैनंदिन कामासाठी संघर्ष करावा लागत होता आणि कामाच्या ठिकाणी वारंवार गैरहजेरीमुळे ते प्रचंड त्रासलेले होते. सुदैवाने ते ऑन्को-लाईफ कॅन्सर (Cancer) सेंटरमध्ये गेले आणि तिथे त्यांच्या उपचारांना योग्य दिशा मिळाली. त्यानंतर बोन मॅरो तपासणी केल्यानंतर रुग्णाला मल्टीपल मायलोमाचे निदान झाले.

सातारा येथील ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ. विनोद पाटील सांगतात की, एप्रिल 2023 मध्ये रुग्ण जेव्हा उपचारासाठी आला तेव्हा त्याला असह्य पाठदुखी आणि पोटदुखीची लक्षणे होती. पेट सिटी स्कॅनमध्ये अनेक गाठी दिसल्या आणि आजार दुसऱ्या टप्प्यात असल्याचे आढळले. मल्टिपल मायलोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो प्लाझ्मा पेशींवर परिणाम करतो, ज्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि अस्थिमज्जेमध्ये आढळून येतात.

ॲंटीबॉडीज निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेल्या पेशी कर्करोगग्रस्त होतात तेव्हा हे दिसून येते, ज्यामुळे त्यांची अनियंत्रित वाढ होते आणि निरोगी पेशींचे नुकसान होते. सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे पाठदुखी किंवा हाडांसंबधी वेदना, ताप, हाडे फ्रॅक्चर होणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे. उपचार पर्यायांमध्ये केमोथेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा समावेश होतो. हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु या उपचार पर्यायांनी त्यावर नियंत्रण मिळू शकते. हा आजार दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्यासाठी ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले जाते.

डॉ. पाटील पुढे सांगतात की, रुग्णाला 4 महिन्यांसाठी पहिला केमोथेरपी प्रोटोकॉल (बोर्टेझोमिब+सायक्लोफॉस्फामाइड+डेक्सा) मिळाला पण रोग नियंत्रणात नव्हता. त्यात बदल करुन (कार्फिलझोमिब+पोमॅलिडोमाइड+डेक्सामेथासोन) हा दुसरा प्रोटोकॅाल देण्यात आला परंतू त्यावर आजार आणखी बळावला. मग हे उपचार (डाराटुमुमॅब, लेनालिडोमाइड आणि डेक्सॅमेथासोन) मध्ये उपचार बदलले गेले. त्यानंतर रुग्णाचे बोन मॅरो रिपोर्ट आणि पेट सिटी स्कॅन नॉर्मल झाले. आता आजार नियंत्रणात आल्यामुळे त्यांचे ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले.

प्रत्यारोपणाच्या कालावधीत रुग्णाला मळमळ, तोंडात काळे डाग पडणे, अन्नाचे सेवन कमी होणे आणि गुदामार्गाला संसर्ग झाला होता. त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते जे इंसुलिनच्या इंजेक्शनने नियंत्रित करण्यात आले. संसर्गासाठी उच्च प्रतिजैविक आणि सर्जिकल उपचार घेण्यात आले.

प्रत्यारोपणानंतर चौदाव्या दिवशी म्हणजे 17 जानेवारी 2024 रोजी रुग्णाला प्रत्यारोपण युनिटमधून स्थिर स्थितीत घरी सोडण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि त्यांना योग्य काळजी घेत किमान 3 महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि ते नियमित ओपीडी फॉलोअपवर आहे. या यशस्वी प्रत्यारोपणाचे श्रेय संपुर्ण टिमला दिले जात असून डॉ. विनोद पाटील यांनी माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय देशमुख, डॉ. प्रताप राजेमहाडिक, डॉ. पुष्पलता मोतलिंग, डॉ. रेवती पवार, शल्यचिकित्सक डॉ. सुमीत सोनार, इन्फेक्शन कंट्रोल प्रभारी डॉ. प्रसाद कवारे, नर्सिंग स्टाफ, सीएसएसडी कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांसह आरएमओचे आभार मानले.

ऑन्को-लाईफने आणखी एक अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वीपणे करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, जो आमच्या टीमसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. प्रत्येक यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपणात रुग्ण आणि त्यांच्या प्रियजनांसाठी नवीन आशावाद दर्शवते, तसेच कर्करोगाशी सामना करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकते, असे ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय देशमुख यांनी स्पष्ट केले.

याबाबतीत रुग्ण म्हणाले, मला मल्टिपल मायलोमा कॅन्सरचे निदान झाले तेव्हा मी खुप घाबरलो होतो तसेच कर्करोगाच्या निदानाने माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी व्यवसायाने शिक्षक आहे आणि मला माझे काम चोखपणे करता येत नव्हते याचे वाईट वाटत होते. मात्र यशस्वी उपचारानंतर आता मी पुन्हा माझे ज्ञानदानाचे कार्य पुर्ववत सुरु करु शकतो याचा मला आनंद झाला आहे. यासाठी मी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या संपुर्ण टिमचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT