BMC Recruitment  Saam Tv
लाईफस्टाईल

BMC Recruitment : नोकरीची सुवर्णसंधी! सरकारी आरोग्य खात्यात 'डीएनबी'साठी शिक्षक पदांची भरती, कसा कराल अर्ज?

BMC Job Vacancy : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' या पदवीव्युत्तर वैद्यकीयांसाठी सुवर्णसंधी आहे

कोमल दामुद्रे

DNB Job Opportunities : सरकारी क्षेत्रात नोकरीची इच्छा पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. बीएमसीत सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे.

मुंबईकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने ही भरती करण्याचे ठरवले आहे. ही भरती श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया आणि इतर माहिती.

1. कसा कराल अर्ज?

या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या (BMC) सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

काही वर्षांपूर्वीच महानगरपालिकेच्या काही रूग्णालयांमध्ये (Hospital) 'डीएनबी' अभ्यासक्रमचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. 'डीएनबी' हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी ८२ पदे असून यानुसार ३ वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत २४६ विद्यार्थी उपलब्ध होऊ शकणार आहेत. या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यामुळे अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यास मदत होते, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

2. भरती संख्या किती

  • वैद्यकीय शिक्षकांची ३४ पदे

  • इतर ८ पदे

  • एकूण ४२ पदे भरण्यात

‌3. कोणत्या सरकारी रुग्णालयात संधी

1. पूर्व उपनगरातील कुर्ला (Kurla) (पश्चिम) परिसरातील खान बहादूर भाभा सर्वोपचार रूग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात १, जनरल मेडिसिन विभागात ३ पदे, यानुसार ४ पदे भरण्यात येणार आहेत.

2. घाटकोपर परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनाजी अमीदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय राजावाडी येथे रेडिऑलॉजी विभागात २, कान, नाक आणि घसा विभागात १, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात १, जनरल सर्जरी विभागात १, अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.

3. पश्चिम उपनगरातील कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोपचार रूग्णालयातील पेडीअॅट्रीक विभागात १, स्कीन अॅंड व्ही. डी. विभागात २ आणि अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरण्यात येणार आहेत.

4. वांद्रे (पश्चिम) येथील खुरशादजी बेहरामजी भाभा सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात २, पेडीअॅट्रीक विभागात २, अॅनॅस्थेसिओलॉजी विभागात २, रेडिऑलॉजी विभागात २, पॅथॉलॉजी विभागात १ आणि कान, नाक, घसा विभागात १ अशी एकूण १२ पदे भरण्यात येणार आहेत.

5. गोवंडी परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी सर्वोपचार रूग्णालयात जनरल मेडिसिन १, अॅनॅस्थेसिओलॉजी आणि रेडिओलॉजी विभागात २, अशी एकूण ३ पदे भरली जाणार आहेत.

6. सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई सर्वोपचार रूग्णालयातील मेडिसिन विभागात २, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात १ तर रेडिओलॉजी विभागात २ अशी एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. याबरोबरच याच रूग्णालयांमध्ये शिक्षकांशिवाय इतर ८ पदे देखील भरण्यात येणार आहेत.

६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे नियमित कामाव्यतिरिक्त अनेक शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली (पश्चिम) येथे डायलेसिस कक्ष डीएनबी शिक्षकांच्या सहाकार्याने महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येत आहेत. तसेच कर्णबधिर रुग्णांवर उपचार म्हणून कॉकलिअर इमल्पांट शस्त्रक्रिया उपनगरीय रुग्णालयांत केल्या जातात. तसेच २०० हून अधिक रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान करणे इत्यादी बाबी या अभ्यासक्रमातील तज्ज्ञ शिक्षकांमुळे सुलभ झाले आहे. जर लवकर सुविधा उपलब्ध झाल्यास मोठया रुग्णालयांवरील ताण कमी होईल अशी माहिती देखील डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT