IBPS Clerk Job Vacancy : तरुणांसाठी खुशखबर ! बँकेत लिपिक पदांसाठी 4045 जागा रिक्त, कसा कराल अर्ज

Job Opportunity : बँकेमध्ये काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
IBPS Clerk Job Vacancy
IBPS Clerk Job VacancySaam Tv
Published On

IBPS Clerk Vacancy : बँकेत काम करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांनो तयारी लागा. बँकेमध्ये काम करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरात विविध पदांसाठी बँकेमध्ये भरती सुरु होणार आहे.

देशभरात विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिक वर्गातील हजारो पदांची भरती होणार आहे. या पदांच्या अर्जाची प्रक्रिया ही १ जुलैपासून सुरु झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने शुक्रवार, 30 जून 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, IBPS लिपिक (13) परीक्षा 2023 (CRP Clerks-XIII) या वेळी 4045 पदांसाठी आयोजित केली जाईल.

IBPS Clerk Job Vacancy
LPG Cylinder Price : एलपीजीचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार का कात्री? तपासा तुमच्या शहरातील दर

1. कोणत्या बँकेत आहेत रिक्त जागा

IBPS द्वारे दरवर्षी लिपिक परीक्षा (Exam) घेतली जाते. या परीक्षेद्वारे बँकामध्ये (Bank) लिपिकांच्या पदांसाठी थेट भरती केली जाते. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असलेल्या बँकांमध्ये सामान्यतः भरती केली जाऊ शकते.

IBPS Clerk Job Vacancy
Money Astro Tips : रस्त्यात सापडलेल्या पैशांनी बदलेल तुमचे भाग्य, कसे ते जाणून घ्या ?

2. पात्रता

  • IBPS लिपिक परीक्षेसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

  • उमेदवाराचे वय (Age) किमान २० वर्ष ते कमाल २८ वर्षांपर्यंत असायला हवे.

  • यामध्ये SC, ST, OBC, EWS, दिव्यांग यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

3. शेवटची तारीख कधी ?

IBPS लिपिक पदासाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे तर शेवटची तारीख ही २१ जुलै आहे.

IBPS Clerk Job Vacancy
Eating Pizza Job: काय सांगता ! चक्क पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार ? कसा कराल नोकरीसाठी अर्ज

4. कसा कराल अर्ज

उमेदवार IBPS संस्थेच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर अर्ज करू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com