Cause Blood Clots In Urine saam tv
लाईफस्टाईल

Blood Clots In Urine: लघवी करताना रक्त पडतंय? शरीराच्या 'या' अवयवांमध्ये निर्माण होतेय कॅन्सरची गाठ, वेळीच लक्ष द्या

Cause Blood Clots In Urine: लघवीत रक्त किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास, ते काही गंभीर रोगांच्या संकेत असू शकतात. अशा स्थितीत त्वरित वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे, कारण हे कधी कधी कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षण असू शकते

Surabhi Jayashree Jagdish

आपल्याला कोणतीही आरोग्याची समस्या असल्यास तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आरोग्याच्या समस्या असल्यास शरीरातून काही संकेत मिळू लागतात. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्येचे निदान करण्यासाठी युरीन टेस्ट हा देखील एक मार्ग आहे. शरीरात जे काही त्रास किंवा समस्या होत असतील, त्यांची लक्षणे लघवीमध्ये देखील आढळून येतात.

जर लघवीमध्ये रक्ताच्या गुठळ्या दिसल्या तर हे काही प्रकारच्या कॅन्सरचं लक्षण देखील असू शकतं. जर तुम्हालाही लघवीमध्ये रक्त किंवा गुठळ्या दिसल्या तर त्याची तपासणी करून घेणं गरजेचं असतं. यामध्ये हे कोणत्या कॅन्सरचं लक्षण असतं ते जाणून घेऊया.

ब्लॅडर कॅन्सर (Bladder Cancer)

मूत्रात रक्ताच्या गुठळ्या दिसणं हे ब्लॅडर कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यावेळी मूत्राशयात अतिरिक्त पेशी तयार होऊ लागतात. हळूहळू या पेशी कॅन्सरच्या बनतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer)

प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणारा एक सामान्य प्रकारचा कॅन्सर आहे. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढू लागतो तेव्हा रुग्णाला समस्या निर्माण होऊ शकतात. या प्रक्रियेत तयार होणाऱ्या या पेशी हळूहळू ट्यूमरच्या आकाराच्या होतात. या गाठीमुळे मूत्रमार्गावर दाब निर्माण होतो आणि मूत्रात रक्ताच्या गुठळ्या दिसून येतात.

किडनी कॅन्सर (Kidney Cancer)

किडनीशी संबंधित आजारांमुळे लोकांना त्यांच्या लघवीत रक्त दिसून येऊ शकतं. ज्यावेळी किडनीचा ट्यूमर तयार होतो तेव्हा किडनी आणि मूत्रमार्गात दाब वाढतो. याचा परिणाम लघवी निर्मितीच्या प्रक्रियेवरही होतो.

सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer)

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर खूप सामान्य आहे. या गंभीर प्रकारच्या कॅन्सरचं प्रारंभिक लक्षण म्हणजे मूत्रात रक्ताच्या गुठळ्या दिसणं. महिलांच्या गर्भाशयात कॅन्सरच्या पेशी तयार झाल्यामुळे ट्यूमर आणि कॅन्सरचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये, कॅन्सर मूत्रमार्गावर देखील परिणाम करतो. यामुळे लघवीमध्ये रक्ताच्या गुठळ्या दिसू लागतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT