Surabhi Jayashree Jagdish
शरीरात सतत वेदना होणं हे कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. हे सतत घडू शकते किंवा मधूनमधून येऊ शकते.
कॅन्सरमध्ये त्वचेमध्ये एक गाठ जाणवू शकते. ही गाठ किंवा सूज त्वचेखाली, स्तनात किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकते.
जसं की त्वचा पिवळी पडणे, काळी पडणे किंवा लाल होणे, जखमा बऱ्या न होणं हे देखील कॅन्सरच्या लक्षणांपैकी एक आहे.
हातपाय कमजोर होणं, चक्कर येणे आणि रात्री झोपताना जास्त घाम येणं ही देखील कॅन्सरची लक्षणं आहेत.
कर्करोगाच्या लक्षणांमध्ये वजन वाढणं आणि कमी होणे देखील समाविष्ट आहे. हे कर्करोगाच्या पेशींद्वारे कॅलरीजच्या अत्यधिक वापरामुळे असू शकते.
कर्करोगामुळे हिरड्यांमधून रक्त येणं, नाकातून रक्त येणं, स्टूलमध्ये रक्त येणं होऊ शकते.