How To Get Rid Of Bloating Stomach Problem Due To Gas And Acidity
How To Get Rid Of Bloating Stomach Problem Due To Gas And Acidity Saam Tv
लाईफस्टाईल

Bloated Stomach Remedies: काहीही खाल्ल्यानंतर पोट फुगते? गॅस झाल्यासारखे वाटते? हे घरगुती उपाय करुन पाहा

कोमल दामुद्रे

उन्हाळ्यात बाहेरचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला अपचन, अॅसिडीटी, गॅसेसची समस्या उद्भवते. अशावेळी पोट जड झाल्यासारखे वाटते. काहीही खावेसे वाटत नाही.

पाचक समस्यांपैकी ब्लोटिंग ही समस्या सामान्य आहे. यामध्ये अनेकदा पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे अस्वस्थ वाटते किंवा पोट फुगलेले दिसते किंवा पोटदुखीचा (Stomach) त्रासही होऊ शकतो. यावर काही घरगुती उपाय (Home Remedies) करुन आपण यावर मात करु शकतो.

1. पेपरमिंट चहा

पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पेपरमिंट चहा खूप उपयुक्त आहे. पेपरमिंटची पाने पाण्यात १० मिनिटे उकळा आणि प्या. हे आतड्यांच्या स्नायूंना आराम देते. तसेच गॅसची समस्या दूर करते.

2. आल्याचा चहा

आले पचन गतिमान करते आणि सूज कमी करते. तसेच गॅसची समस्या दूर होण्यासाठी मदत करते. हा चहा बनवण्यासाठी आल्याची काही ताजी पाने किंवा आले १० मिनिटे उकळून प्या.

3. कॅमोमाइल चहा

कॅमोमाइल चहा त्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. तसेच गॅस तयार होत नाही. त्यामुळे हे प्यायल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते. रात्री झोपही चांगली लागते. हा चहा बनवण्यासाठी कॅमोमाइलची फुले पाण्यात ५ मिनिटे उकळून प्या.

4. बडीशेप

बडीशेप पचनासाठी खूप फायदेशीर (Benefits) आहे. हे पोटाच्या स्नायूंना आराम देते. गॅस, अपचन आणि गोळा येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर बडीशेप खा.

5. कोमट लिंबू पाणी

लिंबू पचन सुधारते आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. यामुळे सूज दूर करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. यासाठी कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, उरुळी कांचनमध्ये दुकान फोडले; घटना CCTV मध्ये कैद

Beed Accident : चारचाकीची दुचाकी, बैलगाडीला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी; बैलांचेही मोडले पाय

Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Gardening करण्याचे आरोगदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT