Morning Tips : सकाळच्या या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर, आज अवलंबा

Morning Routine : बदलेली जीवनशैली, कामाच्या पद्धती, सततचा ताण यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत.
Morning Tips
Morning TipsSaam Tv

Morning Healthy Habits :

बदलेली जीवनशैली, कामाच्या पद्धती, सततचा ताण यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत.

अनेक गंभीर आजारांना (Disease) बरे करण्यासाठी औषधांची गरज असतेच पण त्यापेक्षा आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत (Lifestyle) बदल करायला हवा. ज्यामुळे आपले आरोग्य (Health) निरोगी राहिल. जाणून घेऊया त्या ५ सवयींबद्दल

सकाळी या ५ सवयींचा अवलंब करा

1.मोबाईलपासून अंतर

सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल वापरण्याची सवय असते. आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सकाळी काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. उठल्यानंतर तासभर तरी फोनला हात लावू नका. यामुळे तणाव आणि चिंता कमी होईल.

Morning Tips
Hip Dysplasia : हिप डिसप्लेसिया म्हणजे काय? याची लक्षणे कोणती? कारणे जाणून घ्या

2. योगासन

निरोगी राहायचे असेल तर रोज सकाळी किमान अर्धा तास योगासने करा. प्राणायाम करण्याची सवय लावा. तसेच यात वर्कआउट करु शकता. यामुळे हृदयाचे ठोके-बीपी नियंत्रणात राहिल. फुफ्फुसाची क्षमता वाढेल.

3. जेवल्यानंतर चाला

जेवल्यानंतर चालण्याची सवय लावा. सतत एकाच जागी काम करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. खाल्ल्यानंतर १० मिनिटे चाला. पोट आणि आतडे क्रियाशील होतात. साखरेची पातळी संतुलित राहाते. अल्सर, अॅसिडीटी, पचनाच्या समस्या आणि कोलेस्टेरॉल कॅन्सरपासून बचाव होईल.

Morning Tips
Pimples And Wrinkles Care Tips: उन्हाळ्यात या ४ टिप्स लक्षात ठेवा, रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून होईल सुटका

4. आनंदी राहा

काम आणि धावपळ यात संतुलन राखून तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता. शरीरात शरीरात उत्सर्जित होणारी एंडोर्फिन आणि सेरोटोनिन यांसारखी फील-गुड रसायने वेदनापासून आराम देतात.

5. उभं राहू नका किंवा जास्त बसू नका

निरोगी जीवनशैलीत आरोग्याची काळजी घ्या. जे लोक तासनतास बसून काम करतात त्यांनी त्यांचे आरोग्य जपायला हवे. जास्त वेळ उभे राहणे आणि बसणे टाळावे. ऑफिसमध्ये तासनतास बसून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करणे असो. जास्त वेळ बसून किंवा उभे राहिल्याने पायातील रक्ताभिसरण मंदावते. ज्यामुळे शरीरात वेदना आणि मज्जातंतूचा त्रास होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com