Pimples And Wrinkles Care Tips: उन्हाळ्यात या ४ टिप्स लक्षात ठेवा, रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून होईल सुटका

Pimples And Wrinkles Care Tips in Marathi: उन्हाळ्यात आपल्याला डागरहित किंवा चमकदार त्वचा हवी असल्यास या ४ टीप्स लक्षात ठेवा. यामुळे रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून आपली सुटका होईल.
Pimples And Wrinkles Care Tips: उन्हाळ्यात या ४ टिप्स लक्षात ठेवा, रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून होईल सुटका
Home Remedies to Reduce Pimples and Wrinkles on FaceSaam tv

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. या काळात आपल्याला चेहऱ्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळात सूर्याच्या किरणांमुळे आणि घामामुळे त्वचेवर परिणाम होतो. यामुळे त्वचा काळा पडतो.

उन्हाळ्यात (Summer Season) आपल्याला डागरहित किंवा चमकदार त्वचा हवी असल्यास या ४ टीप्स लक्षात ठेवा. यामुळे रिंकल्स आणि पिंपल्सच्या (Pimples) समस्येपासून आपली सुटका होईल.

Pimples And Wrinkles Care Tips: उन्हाळ्यात या ४ टिप्स लक्षात ठेवा, रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून होईल सुटका
After Facial Care Tips: फेशियल केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका; त्वचेला सतत सुटेल खाज, येतील रॅशेस

1. चेहरा धुताना

उन्हाळ्यात किमान दिवसातून दोन वेळा चेहरा (Skin) धुणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा त्वचेचा प्रकारही समजून घ्यावा लागेल. त्यानुसार फेस वॉश निवडा.

2. सनस्क्रिनचा वापर

सनस्क्रिनचा वापर हा प्रत्येक ऋतूत करायला हवा. परंतु, उन्हाळ्यात याची विशेष गरज असते. हे फक्त सूर्याच्या अतिनिल किरणांपासून तुमचे रक्षण करत नाही तर प्रदूषण आणि इतर गोष्टींपासूनही तुमचे रक्षण करते.

3. एक्सफोलिएट

उन्हाळ्यात त्वचेचला एक्सफोलिएट करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या त्वचेचा प्रकारानुसार स्क्रब निवडा. हा स्क्रब खरेदी करताना त्वचेशी संबंधित समस्याही लक्षात ठेवा. जर चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर कडुनिंबाचा स्क्रब वापरा.

Pimples And Wrinkles Care Tips: उन्हाळ्यात या ४ टिप्स लक्षात ठेवा, रिंकल्स आणि पिंपल्सच्या समस्येपासून होईल सुटका
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावल्याने काय होते?

4. भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात त्वचेला डिहायड्रेट होण्यापासून थांबवा. यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा तर सुधारेलच पण पिंपल्सच्या समस्येपासून सुटका होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com