Blind Person : सध्या सर्व व्यक्तींना फोनचे व्यसन लागले आहे. काही मिनीटांसाठी देखील व्यक्ती फोन आपल्यापासून दूर ठेवण्यास तयार नसतात. फोन, लॅपटॉप, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनीक गॅझेटमुळे त्याचा उजेड थेट डोळ्यांवर पडतो. यामुळे अनेकांना दृर्ष्टी दोश निर्माण झाला आहे. तर काही व्यक्तींना कायमचं अंधत्व आलं आहे. मात्र आता लवकरच गेलेली दृष्टी पुन्हा मिळवता येणार आहे. (Political News)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून संशोधक गेलेली दृर्ष्टी परत कशी मिळवता येईल यावर संशोधन करत आहेत. हे संशोधन आता बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. संशोधकांनी लॅबमध्ये रेटिनल न्यूरॉन तयार केले आहे. यामार्फत गेलेली दृष्टी पुन्हा येण्यास मदत होणार आहे. रेटिनल न्यूरॉन हे औषध सध्या तयार होत असून मानवी डोळ्यांवर प्रयोग करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहचले आहे.
यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉनसिन - मेडिसनचे वैज्ञानीक गेल्या अनेक दिवसांपासून रेटिनल न्यूरॉनवर काम करत आहेत. हे औषध आणखीन फायदेशीर ठरावे यासाठी वैज्ञानीकांची एक संपूर्ण टीम काम करत आहे. आता पहिल्यांदाच क्लिनीकमध्ये हे औषध एखाद्या रुग्णावर वापरले जाणार आहे. या औषधाला रेटिनल ऑर्गेनॉयड्स असं देखील म्हणतात. मानवी त्वचेवरील कोशिकांमार्फत हे औषध बनवण्यात आल्याचे समजले आहे.
रेटिनल ऑर्गेनॉयड्समध्ये आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये दृष्टीसह इलेक्ट्रिक वेव देखील तयार होतात. नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थमार्फत सांगण्यात आले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीची दृष्टी जाते तेव्हा त्या व्यक्तीला व्हिज्यूअल माहिती मिळत नाही. त्या व्यक्तीच्या शरीरात प्रकाश रीजनरेट होत नाही.
कसे काम करते रेटिनल न्यूरॉन
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील न्यूरोसायन्सचे प्रोफेसर रौनक सिन्हा यांनी याबाबत सांगितले आहे की, मॅक्युलर डिजेनेरेशनसारख्या आजारांमुळे व्यक्ती अंध बनतात. यात रेटिनाच्या मधल्या भागांच्या पेशी मरतात. परंतु, स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या या पेशी त्रिमितीय मिनी रेटिनामध्ये विकसित केल्या जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.