Viral Video: पठ्ठ्यानं कहरच केला! गोल नाही तर चौकोनी चाकांची सायकल; रस्त्यावर चालते तरी कशी?

Viral Square Wheel Cycles : सध्या सोशल मीडियावर चौकोनी चाक असलेल्या सायकलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Bicycle : आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या सायकल पाहिल्या असतील. यामध्ये स्टायलीश सायकल, लेडीज सायकल, गेअर असलेली सायकल अशा वेगवेगळ्या सायकल तुम्ही आजवर पाहिल्या असतील आणि चालवल्याही असतील. मात्र तुम्ही कधी चौकोनी चाक असलेली सायकल पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर चौकोनी चाक असलेल्या सायकलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Marathi News)

सायकलीचे अनेक प्रकार आहेत. मात्र सायकल किंवा कोणतेही वाहन गोल चाक असल्याशिवाय फिरू शकत नाही. पण एका व्यक्तीने चक्क चार कोन असलेली सायकल बनवली आहे. ही सायकल पाहिल्याबरोबर ती नेमकी कशी चालत असेल असा प्रश्न समोर उभा राहतो. चाक फिरण्यासाठी आणि सायकल पुढे जाण्यासाठी ते चाक गोल असेल तरच फिरते. मात्र ही सायकल चौकोनी असून रस्त्यावर चालताना दिसत आहे.

Viral Video
Pune Crime: वाहन चोरीचे दहा गुन्‍हे उघड; सव्‍वासात लाखाचा मुद्देमाल जप्‍त

@Rainmaker1973 या ट्विटर अकाउंटवर ११ एप्रिल रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण ही चौकोनी सायकल चालवताना दिसतो आहे. व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झालेत. तुम्ही देखील हा व्हिडिओ व्यवस्थीत पाहिल्यास तुमच्याही लक्षात येईल की, ही सायकल चौकोनी चाकांवर नाही तर त्याच्या टायरवर चालत आहे.

सायकल चालताना त्याचे रबराचे टायर फिरताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. उगच वेळ आणि पैसा वाया घालवला आसं एकाने म्हटलं आहे. तर काहींनी अशी सायकल बनवल्याने त्या तरुणाचे कौतुक केले आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर २ कोटी १३ हजार व्हुव्ज मिळाले आहेत. तसचे ४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Viral Video
WhatsApp Problem : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बिघाड; व्हिडिओ डाउनलोडसह शेअरींगमध्ये अडचणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com