birds hearing without ears science explanation saam tv
लाईफस्टाईल

Birds Hearing : पक्ष्यांना कान नसूनही कसं ऐकू येतं? पाहा यामागे विज्ञान काय सांगतं?

birds hearing without ears science explanation : पक्षी ऐकू शकतो, परंतु त्याचे कान कुठे आहेत? नीट बघितले तर पक्ष्यांना कान नसतात, पण तरीही ऐकतात, मग त्यांचे कान कुठे असतात? कान नाहीत तरी त्यांना कसं ऐकू येतं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?

Surabhi Jayashree Jagdish

आपण दररोज पक्षी पाहतो, मात्र तुम्ही कधी काळजीपूर्वक पक्ष्यांना पाहिलं आहे का? पक्षी त्यांच्या सभोवतालच्या आवाजांबद्दल खूप संवेदनशील असतात. छोटा आवाज जरी झाला तरी त्याकडे त्यांचं लक्ष असतं. पण तुम्ही कधी पक्ष्याचं कान पाहिले आहेत का? पक्षी ऐकू शकतो, परंतु त्याचे कान कुठे आहेत? नीट बघितले तर पक्ष्यांना कान नसतात, पण तरीही ऐकतात, मग त्यांचे कान कुठे असतात? कान नाहीत तरी त्यांना कसं ऐकू येतं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का?

डोक्यात असतं एक छिद्र

पक्ष्यांना प्राणी आणि मानव यांच्यासारखे कान नसतात. याचाच अर्थ पक्ष्यांना बाह्य कान नाहीत. मग पक्ष्यांना कान असतात कुठे? पक्ष्यांच्या डोक्यात एक लहान छिद्र असते ज्याद्वारे त्यांच्या मेंदूपर्यंत आवाज पोहोचू शकतो.

या छिद्राला काय म्हणतात?

हे छिद्र शरीरावरील पिसांनी झाकलेलं असल्याने ते सहजपणे दिसून येत नाही. याला इयर कोवर्ट्स किंवा ऑरिक्युलर फीदर्स देखील म्हणतात. हे विशेष लहान पिसं केवळ कानाची छिद्रेच झाकत नाहीत तर पक्ष्यांना अनेक दिशांनी येणारे आवाज ऐकण्यास मदत करतात.

या पंखाच्या आत, एक फनेलच्या आकाराचं छिद्र असतं. ज्या माध्यमातून आवाज पक्ष्याच्या आतील कानात जातो. यानंतर, कानाच्या कॅनलसह, कानाचे बाह्य, मध्य आणि अंतर्गत भाग आहेत.

संशोधनानंतर शास्त्रज्ज्ञ काय म्हणाले?

पक्ष्यांच्या डोक्यात जिथे सामन्यापणे सगळ्या प्राण्यांचे कान असतात त्या ठिकाणी उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना छिद्रं असतात. या पक्ष्यांना सर्व आवाज ऐकू यावेत म्हणून ते इकडे तिकडे मान वळवत राहतात. यावर ज्यावेळी संशोधन केलं गेलं तेव्हा शास्त्रज्ञांना असं समजलं की, पक्ष्यांच्या डोक्याचा आकार असा आहे की, त्याच्या फिरण्यामुळे ते वेगवेगळ्या दिशांनी येणारे आवाज ओळखू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT