Surabhi Jayashree Jagdish
महाभारत हे आजपर्यंतचे जगातील सर्वात विनाशकारी युद्ध मानलं जातं. ज्यात अवघ्या 18 दिवसांत जगातील अनेक योद्ध्यांनी जीव गमावला.
यामध्ये अर्जुनच्या गांडीव धनुष्यामुळे सर्व महान योद्ध्यांचा नाश झाला होता. हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र मानण्यात येतं.
महाभारतानुसार, गांडीव हे एक दैवी धनुष्य होते, ज्याचा भयंकर आवाज शत्रूंना घाबरवायचा. ते फक्त अर्जुनच उचलू शकत होता. जे त्याला खांडवप्रस्थ वन जाळण्यासाठी अग्निदेवाकडून मिळाले.
महाभारतानंतर स्वर्गात गेल्यावर अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचं आणि अक्षय तीरांचं काय झालं ते यासंबंधीच्या कथाही आहेत.
असं म्हणतात की, जेव्हा पांडव स्वर्गाकडे निघाले तेव्हा अग्निदेवाने त्यांना गांडीव धनुष्य वरुणदेवाला परत करण्यास सांगितले, त्यानंतर अर्जुनने धनुष्य समुद्राकडे सुपूर्द केले.
उत्तराखंडमध्ये असं मानण्यातयेतं की, अर्जुनने चंपावत जिल्ह्यातील ब्यांधुरा मंदिराजवळ स्वर्गाच्या प्रवासादरम्यान गांडीव धनुष्य दगडाखाली लपवलं होतं.
जंगलाच्या मधोमध डोंगराच्या माथ्यावर बांधलेले ब्यांधुरा मंदिर हे अर्जुनाचा अवतार मानल्या जाणाऱ्या आदिदेवतेचं मंदिर मानलं जातं. बिहारमध्येही मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी ब्लॉकमधील शिवनगर गावात गांडीवेश्वर नाथ महादेवजवळ अर्जुनाचे गांडीव धनुष्य लपवून ठेवल्याची श्रद्धा आहे.
या ठिकाणी देण्यात आलेली गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर असून आम्ही याची खातरजमा करत नाही.