Jimny To Bolero Diwali Offers  Saam Tv
लाईफस्टाईल

Jimny To Bolero; या सहा SUVs वर मिळत आहे 3.50 लाखांची सूट, पाहा लिस्ट

Jimny To Bolero; या सहा SUVs वर मिळत आहे 3.50 लाखांची सूट, पाहा लिस्ट

Satish Kengar

Diwali Car Offers 2023:

दिवाळीच्या निमित्ताने अनेक ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या एसयूव्हीवर भरघोस सूट देत आहेत. सवलत देणाऱ्या यादीत मारुती सुझुकी, महिंद्रा, स्कोडा, जीप आणि सिट्रोएन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कंपनीसोबतच डीलर्सही त्यांच्याकडून अनेक ऑफर्स देत आहेत.

यामध्ये 50,000 रुपयांपासून ते 3.50 लाख रुपयांपर्यंतच्या सूट ऑफरचा समावेश आहे. या सवलतीचा फायदा कारच्या स्टॉकवरही अवलंबून असतो. चला तर मग SUV वर उपलब्ध असलेल्या या सवलतीबद्दल जाणून घेऊया...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Mahindra Bolero Neo, 50,000 रुपयांपर्यंत लाभ

बोलेरो निओमध्ये अपडेटेड BS6 फेज-2 डिझेल इंजिन आहे, जे 100bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. यात चांगल्या ऑफ-रोड हाताळणीसाठी एक मल्टी-टेरेन तंत्रज्ञान देखील ऑफरवर देण्यात आले आहे, जे फक्त टॉप-स्पेक N10 (O) प्रकारापुरते मर्यादित आहे.  (Latest Marathi News)

2. Mahindra Bolero, 70,000 रुपयांपर्यंत सूट

महिंद्रा बोलेरोला 1.5-लिटर डिझेल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल युनिटशी जोडलेले आहे, जे 75bhp पॉवर आणि 210Nm आउटपुट जनरेट करते. दुसरीकडे बोलेरो निओला 1.5-लिटर डिझेल इंजिनमधून पॉवर मिळते, जे 100bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सद्वारे व्हील्सला पॉवर देते.

3. Maruti Suzuki Jimny Zeta, 1 लाख रुपयांपर्यंत सूट

मारुती जिमनीचे एंट्री लेव्हल व्हेरियंट Zeta आहे. डीलर्स या प्रकारावर 50,000 रुपयांची सवलत देत आहेत. यासह, अतिरिक्त एक्सचेंज किंवा 50,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील उपलब्ध आहे. यात टॉप-स्पेक अल्फा व्हेरियंट प्रमाणेच 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन आहे. यात त्याच्या 4WD ऑफ-रोड गियरचा समावेश आहे. जिमनीमधील इतर फीचर्समध्ये स्टील व्हील, 7.0-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 6 एअरबॅग्ज आणि ईपीएस यांचा समावेश आहे.

4. Volkswagen Taigun, 1 लाख रुपयांपर्यंत सूट

या कारमध्ये 1.0-लिटर TSI इंजिन आहे जे 115hp आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. यात अधिक पॉवरफुल 1.5-लिटर TSI आहे, जो 150hp आणि 250Nm जनरेट करतो. हे इंजिन समान 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. यात 7-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्सचा पर्याय देखील आहे.

5. Mahindra XUV300, 1.2 लाख रुपयांपर्यंत सूट

Mahindra XUV300 च्या बेस व्हेरिएंट W2 MT पेट्रोलची किंमत अजूनही 7.99 लाख रुपये आहे. याच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याच्या W4 MT पेट्रोलची नवीन किंमत 8.66 लाख रुपये झाली आहे, जी पूर्वी 8.41 लाख रुपये होती. W6 AMT पेट्रोलची नवीन किंमत 10.70 लाख रुपये झाली आहे, जी पूर्वी 10.85 लाख रुपये होती. त्याचप्रमाणे W6 टर्बो पेट्रोल खरेदी करणे आता 21 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. याची नवीन किंमत 10.50 लाख रुपये आहे. W4 MT डिझेलची नवीन किंमत 10.21 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 9.90 लाख रुपये होती. म्हणजेच ती खरेदी करणे आता 31 हजार रुपयांनी महागले आहे.

6. Mahindra XUV400, 3.5 लाख रुपयांपर्यंत सूट

महिंद्र XUV400 दोन ट्रिम्स, EC आणि EL मध्ये सादर करण्यात आली आहे. EC ची बॅटरी क्षमता 34.5 kWh आहे. एका चार्जमध्ये ही ही कार 375 किमी धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. तर EL ची बॅटरी क्षमता 39.4 kWh आहे. याची ड्रायव्हिंग रेंज 456 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT