Budget Friendly Car
Budget Friendly CarSaam Tv

Budget Friendly Car: दिवाळीत घरी आणा नवी कार; दमदार सेफ्टी फीचर, सर्वसामान्यांना परवडेल अशी किंमत

Budget Friendly Car: खिशाला परवडतील अन् जबरदस्त फिचर असणाऱ्या कार.
Published on

Budget Friendly Safe Car:

दिवाळीच्या मूहूर्तावर अनेकजण वाहन खरेदी करतात. वाहन खरेदी करण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त अगदी चांगला असतो असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे यावर्षीही खूप लोक वाहन खरेदी करतील अशी शक्यता आहे.

कार खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा. अनेकदा अपघात होताना पाहतो. दिवसेंदिवस अपघाताच्या संख्या वाढतच आहेत. यासाठी कारमध्ये एअरबॅग असणे खूप महत्त्वाचे असते. लोक कार खरेदी करताना सर्वात आधी सुरक्षेची खात्री करतात. कारमध्ये किती एअरबॅग आहेत हे पाहतात. त्यानंतरच कार खरेदी करतात. कारमध्ये जेवढी वैशिष्ट्ये जास्त तेवढी किंमतही जास्त. मात्र, आज आम्ही तुम्हाला 10 लाखांच्या जवळपास आणि 6 एअर बॅग्ज असणाऱ्या कारची माहिती देणार आहोत.

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉनची स्मार्ट पेट्रोल व्हेरियंट कार सुरक्षित आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. कार अनेक वैशिष्ट्यांसह बाजारात उपलब्ध आहे. कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, स्पीड अलर्ट, अँटी थेप्ट डिव्हाईस हे फिचर देण्यात आले आहे. कारचे मायलेज 17.44 किमी/ लिटर आहे. या कारची ऑन रोड किंमत 9.50 ते 9.52 लाख रुपये आहे.

ह्युंदाई व्हेन्यू

ह्युंदाई व्हेन्यूची एमटी-ई, एमटी-एस पेट्रोल व्हेरियंट कारमध्येदेखील एअरबॅग्ज आहेत. कारमध्ये रिअर पार्किंग असिस्ट सिस्टिम, कॉर्नरिंग लॅम्प, ऑटो हेडलॅम्प विथ एस्कॉर्ट फंक्शन, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल हे फिचर देण्यात आले आहेत. कारचे मायलेज 7.90 किमी/ लिटर आहे. कारची ऑन रोड किंमत 8.50 ते 9.75 लाख रुपये आहे.

Budget Friendly Car
Aadhaar Card Lock : आधार कार्ड लॉक होऊ शकतं? टिप्स आणि ट्रिक्स वाचा

किया कॅरेन्स

किया कॅरेन्सची प्रीमियम पेट्रोल व्हेरियंट कार सुरक्षित आहे. कारमध्ये एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, चाईल्ड सेफ्टी लॉक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, टायर प्रेशर वॉर्निंग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल असे फिचर्स देण्यात आले आहे. कार 16.20 किमी/ लिटर मायलेज देते. कारची ऑन रोड किंमत 10.45 लाख रुपये आहे.

मारुती- सुझुकी बलेनो

मारुती सुझुकीची झेटा पेट्रोल व्हेरियंटची कार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खूप चांगली आहे. कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिची प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, चाईल्ड सेफ्टी लॉक असे फिचर्स आहेत. कार 22.35 किमी/ लिटर मायलेज देते. कारची ऑन रोड किंमत 9.70 लाख रुपये आहे.

Budget Friendly Car
Elon Musk Offer: विकिपीडियानंतर इलॉन मस्क यांची मेटाला ऑफर, नेमकं काय झालं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com