Ratan Tata News : 'माझा क्रिकेटशी काही संबंध नाही...'; वर्ल्डकप सामन्यासंबंधी फेक न्यूजवर रतन टाटा स्पष्टच बोलले

Ratan Tata clears on Fake News : फेक न्यूज व्हायरल झाल्यानंतर रतन टाटांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Ratan Tata News
Ratan Tata NewsSAAM TV
Published On

Ratan Tata Statement On Fake News :

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं विजय मिळवल्यानंतर फिरकीपटू राशिद खानला रतन टाटांकडून १० कोटींचे बक्षीस दिल्याच्या बोगस पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यावर रतन टाटा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिकेटशी माझा काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपासून रतन टाटांबद्दलची एक पोस्ट व्हायरल होत आहे. रतन टाटा हे अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानला १० कोटी रुपये दिल्याचा दावा त्यात करण्यात आला होता. त्यानंतर स्वतः रतन टाटांनी हा दावा खोडून काढला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. अशा गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रतन टाटा (Ratan Tata) यांनी सोमवारी आपल्या अधिकृत एक्स (Twitter) अकाउंटवरून रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्याचं खंडन केले आहे. माझ्या नावाने चुकीची माहिती पसरवली जात आहे. जोपर्यंत माझ्या अधिकृत अकाउंटवरून काही पोस्ट केल्या जात नाहीत, तोपर्यंत कृपया अशा प्रकारचे फॉरवर्डेड मेसेज किंवा व्हिडिओवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Ratan Tata News
Video Viral: मालकाचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांशी भिडला बहादूर कुत्रा

मी आयसीसी (ICC) किंवा कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस देण्याच्या संदर्भात कुठलाही सल्ला दिला नाही. माझा तर क्रिकेटशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. अशा प्रकारच्या व्हायरल झालेल्या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली होती. त्यात अफगाणिस्तानने जबरदस्त विजय मिळवला होता. त्यात राशिद खानने चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर राशिद खानने मैदानात जल्लोष केला होता. मैदानातच तो नाचला होता. त्यानंतर सोशल मीडियावर रतन टाटांशी संबंधित चुकीची माहिती पसरवणारी पोस्ट व्हायरल झाली होती.

Ratan Tata News
Delhi Metro Viral Video: मेट्रो ट्रेनमध्ये तरुणीने तरुणाच्या लगावली कानशिलात ; दोघांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com