Video Viral: मालकाचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोरांशी भिडला बहादूर कुत्रा

Dog video viral : आपल्या मालकावर कोणीतरी हल्ला करत असल्याचं दिसताच बहादूर कुत्र्यानं हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला.
Video Viral
Video ViralX twitter
Published On

Viral Video Of Dog Saving his Owner:

कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याचं म्हटलं जातं. अनेक अशी उदाहरणं आपण वाचली किंवा पाहिली असतील ज्यात कुत्र्याने आपल्या प्रामाणिकपणाचा दाखला दिला असेल. आपल्यावर जीव लावणाऱ्या मालकासाठी कुत्रा जीव देत असतो, याचं एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आलंय. (Latest News)

एक माणूस आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला जात होता. त्यावेळी चोरट्यांनी त्या माणसावर हल्ला केला. आपल्या मालकावर कोणीतरी हल्ला करत असल्याचं दिसताच बहादूर कुत्र्यानं हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला. सायंकाळीच्या वेळी एक माणूस आपल्या कुत्र्यासोबत फिरायला जात असल्याचं दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संपूर्ण रस्त्यावर कुणीच दिसत नाही. त्यावेळी एका दुचाकीवर दोन व्यक्ती येतात. काही अंतर पुढे गेल्यानंतर ते यू-टर्न घेऊ परत येतात. त्यावेळी दुचाकीवरील एक जण या व्यक्तीकडे येतो आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मालकावर हल्ला होत असल्याचं पाहून कुत्रा त्या हल्लेखोरावर हल्ला चढवतो. कुत्र्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे हल्लेखोर घाबरतो आणि तो आपल्या साथीदारासह पळून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट एक्सवर Figen @TheFigen_ द्वारे पोस्ट करण्यात आलाय.

व्हिडिओ असताना कॅप्शनही दिलंय. याचमुळे कुत्र्याला सर्वात चांगला मित्र म्हटलं जातं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग जॉर्ज नावाच्या व्यक्तीने लिहिले, 'त्या व्यक्तीने कुत्र्याला (चोरांना) का चावू दिले नाही?. तर मस्क होलिक यांनी लिहिलं की, माझा कुत्रा एकदा एका अनोळखी व्यक्तीला आमच्या घरात घेऊन आला.

Video Viral
Viral Video: जन्मदात्या आईचा अमानुष छळ, डोकं आपटलं, केस ओढले अन् कानाखाली... संतापजनक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com