India, Russia Petrol-Diesel: रशिया बनला भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol-Diesel Price: रशियाने या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत इंडियन क्रूड ऑइल बास्केटमध्ये ४० टक्के हिस्सा मिळविला आहे
India, Russia Petrol-Diesel
India, Russia Petrol-DieselSaam Digital
Published On

India, Russia Petrol-Diesel

इस्राइल पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धामुळे आखाती देश आजकाल चर्चेचा विषय बनले आहेत. गाझापट्टीत इस्राइलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अरब देशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मात्र आखाती देशांना झटका देणारी मोठी बातमी आहे, मात्र ती गाझामधून नाही तर भारतातून आहे. रशियानेच आखाती देशांना मोठा झटका दिला आहे. रशियाने या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत इंडियन क्रूड ऑइल बास्केटमध्ये ४० टक्के हिस्सा मिळविला आहे.

बास्केटमध्ये यापूर्वी आखाती देशांचा एकछत्री अंमल होता. २०२२ मध्ये युक्रेन-रशिया युद्धाच्या आधी आखाती देशांची मोठी हिस्सेदारी होती. रशियाचा फक्त २ टक्के हिस्सा होता. युक्रेन-रशिया युद्धानंतर रशियावर अनेक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे रशियाने भारताला क्रूड ऑइल पुरवठा सुरू केला. त्याचा भारताला मोठा फायदा झाला. त्यांनतर काही महिन्यातच रशियाची बास्केटमधील हिस्सेदारी ओपक देशांपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

India, Russia Petrol-Diesel
Jharkhand News : सहा मित्रांचा धरणात बुडून मृत्यू, कॉलेजला दांडी मारुन गेले होते फिरायला

भारत, जगातील तिसरा सर्वात मोठा ऑईल आयातदार आणि ग्राहक आहे. दरम्यान या वर्षाच्या अखेरीस सौदी अरेबियाने ऐच्छिक उत्पादन कपात वाढविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मध्य-पूर्वेतील पुरवठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत दुसऱ्या पर्यायांचाही विचार करू शकतो .

भारताने एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत म्हणजे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत दरदिवशी १. ७६ दशलक्ष बॅरल तेल आयात केले आहे. मागच्या वर्षी जवळपास प्रतिदिन ७,८०,००० तेलाची आयात करण्यात आली होती. आकडेवारीनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये यामध्ये घाट झाली होती मात्र , सप्टेंबरमध्ये १. ५४ दशलक्ष बॅरल तेलाची आयात करण्यात आली आहे. ही आयात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ११. ८ टक्के अधिक आणि मागच्या वर्षी पेक्षा ७१. ७ टक्के अधिक आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रशियामधून मोठ्याप्रमाणात तेलाची आयात करण्यात येत असल्यामुळे तेलाच्या किमती स्वस्त होतील असा अंदाज होता. मात्र रशियातील तेलाच्या किमती सुद्धा ८० डॉलरवर पोहोचल्यामुळे २०२२ मध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात फारसा बदल झालेला नाही.आखाती देशांच्या तुलनेत रशियातील तेल सध्या १० ते १५ टक्के स्वस्त आहे. सप्टेंबरमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार भारताला रशियाकडून कच्चे तेल प्रति बॅरल ८० डॉलरने मिळत आहे. ही किंमत पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या मर्यादेपेक्षा २० डॉलरने अधिक आहे. भारताला रशियातून मिळणारे हे तेल ब्रेंट क्रूड ऑईलच्या तुलनेत १३ ते १४ टक्के स्वस्त मिळत आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑईलचे दर ९४ डॉलर प्रति बॅरल तर अमेरिकी तेल ९१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

India, Russia Petrol-Diesel
Namo Bharat Rapid Train: भारतात धावणार आता 'नमो भारत', देशातील पहिली रॅपिड ट्रेन PM मोदींकडून भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com